आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo मुळे आमीरने सोडला चित्रपट, पोलिस ठाण्यात बुर्का परिधान करून गेली होती तनुश्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तनुश्री दत्ताच्या सेक्श्युअल हॅरेसमेंट प्रकरणात पोलिसांनी अखेर नाना पाटेकर विरोधात FIR दाखल केला आहे. रात्री उशिरा तनुश्री बुर्का परिधान करून मुंबईच्या ओशिवारा पोलिस ठाण्यात गेली. त्याठिकाणी तिने जबाब नोंदवला. याठिकाणी तिने कोरिओग्राफर गणेश आचार्य, डायरेक्टर राकेश सारंग आणि प्रोड्युसर समी सिद्दिकी यांच्या विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी दुपारी नानाचे वकीलही ओशिवारा पोलिस ठाण्यात पोहोचले. तनुश्रीने गेल्या आठवड्यात या प्रकरणी लेखी तक्रार दिली होती. 


सेक्श्युअल हॅरेसमेंट च्या मुद्द्यावर आमीरने सोडला चित्रपट 
- दुसरीकडे सेक्श्युअल हॅरेसमेंटच्या शिकार ठरलेल्या महिलांच्या सपोर्टमध्ये आमीर खान समोर आला आहे. त्यासाठी त्याने गुलशन कुमार यांच्यावरील बायोपिक 'मुगल' सोडला आहे. 
- आमिरने ट्वीट केले की, इंडस्ट्रीशी संबंधित असल्याने सामाजिक मुद्द्यांचा विचार करणे ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा  #MeToo कॅम्पेनबाबत अनेक वक्तव्ये आली तेव्हा आम्ही ज्यांच्याबरोबर काम करणार होतो, त्यांचे नावही अशाच प्रकरणात आले आहे. या प्रकरणी चौकशी केली तेव्हा कोर्टात प्रकरण सुरू असल्याचे समजले. त्यामुळे त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही घेतला. चित्रपटसृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे मला वाटते. 
- आपल्या इंडस्ट्रीमध्ये अनेक महिला शोषणाच्या शिकार ठरल्या आहेत. पण ही इंडस्ट्री सुरक्षित बनवणे आपली जबाबदारी आहे.  आमिरने जो चित्रपट सोडला आहे, त्यात तो अॅक्टींगबरोबरच निर्मिती बरोबरच निर्माता म्हणूनही सहभागी होणार होता. 
- चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार होते. त्यांच्यावर चार वर्षांपूर्वी गितिका त्यागी नावाच्या मॉडेल आणि अॅक्ट्रेसने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांना अटकही झाली होती, पण नंतर त्यांना जामीन मिळाला. 
- सुत्रांच्या माहितीनुसार, आमीरच्या स्टेटमेंटनंतर भूषण कुमार यांनी सुभाषला चित्रपट सोडण्यास सांगितले आहे. 

 

pic.twitter.com/NidpxviA95

— Aamir Khan (@aamir_khan) October 10, 2018

 

आमीरच्या अॅक्शनवर काय म्हणाले सुभाष 
- सुभाष कपूर यांनी आमीरच्या अॅक्शनवर रिअॅक्शन दिली आहे. ते म्हणाले मी आमीरच्या निर्णयाचा आदर करतो. कारण हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. मी निर्दोष असल्याचे कोर्टासमोर मांडेल. 
- सुभाष कपूर म्हणाले, मला एक प्रश्न विचारायचा आहे. एखाद्या रडणाऱ्या महिलेला न सांगता तिचा व्हिडिओ तयार करणे आणि तो सोशल मीडियावर अपलोड करणे ही हॅरेसमेंट नाही का? आणि जर तोच व्हिडिओ एखाद्या व्यक्तीच्या विरोधात हॅरेसमेंट केससाठी वापरला तर ते चूक ठरणार नाही का? तुम्ही जर उत्तर टाळून नंतर उत्तर देतो म्हणाले तर ही खाप पंचायत मेंटॅलिटी ठरेल. 

 

बातम्या आणखी आहेत...