आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Tapasi Answers To Kangana's Sister Rangoli 'Makers Did Not Come To Me, I Went To Ask For Work'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​​​​​​​कंगनाची बहीण रंगोलीला तापसीचे उत्तर - 'मेकर्स माझ्याकडे आले नव्हते, मी काम मागण्यासाठी गेले होते' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'सांड की आंख' मध्ये शूटर आजीची भूमिका करत असलेली अभिनेत्री तापसी पन्नूने त्या रिपोर्ट्सवर आता मौन सोडले आहे, ज्यामध्ये म्हणाले जात आहे की, आधी ही, भूमिका कंगना रनोटला ऑफर झाली होती. झाले असे की, कंगनाची बहीण रंगोली चंदेलने एका ट्वीटमध्ये म्हणाले होते की, कंगनाने हा रोल नाकारला होता, कारण तिची इच्छा होती की, त्याच वयाच्या अभिनेत्रीने ही भूमिका करावी. आता याप्रकरणी तापसी म्हणाली आहे की, या चित्रपटासाठी मेकर्सने मला अप्रोच केले नव्हते, तर मी स्वतः काम मागण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते.  

हे आहे तापसीचे पूर्ण स्टेटमेन्ट... 
तापसी म्हणाली, "मेकर्स नक्कीच कंगना रनोटकडे हा रोल घेऊन गेले असतील. खरं तर ते जवळजवळ अर्ध्या इंडस्ट्रीकडे गेले होते, कारण त्यांना विचित्र कारणे मिळत होती. जिथपर्यंत माझा प्रश्न आहे, मेकर्सने मला कधी अप्रोच केले नाही. जेव्हा मला कळाले की, अशाप्रकारचा एक चित्रपट प्लॅन होत आहे, तेव्हा मी स्वतः त्यांच्याकडे रोल मागण्यांसाठी गेले होते. मला हे स्वीकारण्यात काहीही लाज वाटत नाही. मी त्यांना म्हणाले की, मी हा रोल करू इच्छिते. पॅरलल लीड रोल शोधण्यासाठी आम्हाला दोन वर्षांचा कालावधी लागला."

'मान्य केले आम्ही 60 वर्षांच्या नाही'
तापसीने चित्रपटात झालेल्या आपल्या कास्टिंग बद्दल म्हणाली, "तापसी आणि भूमी 60 वर्षांच्या नाहीत. मान्य केले. पण मग अभिनेत्रींचा काय जॉब आहे ? जर मी प्रत्येक चित्रपटात स्वतःलाच दाखवले तर मग मला स्वतःला अॅक्टर म्हणवणे सोडून दिले पाहिजे. प्रत्येक चित्रपटात मी तापसी पन्नूच का असायला हवी."

मेकर्सने याआधीच दिले आहे कंगनाला उत्तर... 
रंगोलीच्या दाव्यावर 'सांड की आंख' च्या मेकर्सचे उत्तर यापूर्वीच समोर आले आहे. मेकर्सचे म्हणणे आहे की, वास्तविक आधी शूटर आजीचा रोल कंगनालाच ऑफर झाला होता आणि ती तो करण्यासाठी तयारही झाली होती. मात्र तिच्या खूप अटी होत्या. आधी तर कंगना हा दबाव टाकत होती की, दोन्ही आजींचा रोल एकच केला जावा, जेणेकरून दुसऱ्या हीरोइनचा प्रश्नच राहणार नाही आणि चित्रपटात सर्वत्र केवळ तीच दिसेल. मग तिचे म्हणणे होते की, जर एका अभिनेत्रीवर चित्रपट होणार नसेल तर चित्रपटात तिचा डबल रोल दाखवला जावा. जेणेकरून शूटर आजी चंद्रो आणि प्रकाशी तोमर दोघींच्याही भूमिका ती करू शकेल. तिच्या या अटी मान्य न झाल्यामुळे तिने चित्रपट सोडला.

अशाप्रकारे मिळाला भूमी-तापसीला हा चित्रपट... 
मेकर्सला कंगनाचे डबल रोलबद्दलचे मत काहीसे आवडलेही होते. कारण 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' मध्ये तिच्या दुहेरी भूमिकेला खूप पसंती मिळावी होती. पण नंतर मेकर्सला वाटले की, दोन्ही आजी खूप प्रसिद्ध आहेत. दोघींचीही आपली एक ओळख आहे. अशात डबल रोल होऊच शकत नाही. म्हणून मेकर्स आणि कंगना यांचे एकमत झाले नाही. फायनली आजींच्या भूमिका तापसी आणि भूमीला मिळाल्या.

25 ऑक्टोबरला रिलीज होत आहे चित्रपट... 
चित्रपट 'सांड की आंख' 25 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात यूपीच्या बागपत येथील शूटर आजी चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांची कथा दाखवली जाणार आहे. ज्यांनी 60 वर्षे वय पार केल्यानंतर शूटिंगच्या जगतात पाऊल ठेवले. चित्रपटात प्रकाश झा, विनीत कुमार सिंह आणि शाद रंधावा यांचादेखील महत्वाच्या भूमिका आहेत.  

बातम्या आणखी आहेत...