आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tapasi Pannu Became Angry, Said We Did Not Make 'Thappad' Film To Give Answer To Shahid Kapoor's 'Kabir Singh'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तापसी पन्नू झाली नाराज, म्हणाली - आम्ही शाहिद कपूरच्या 'कबीर सिंह' ला उत्तर म्हणून बनवला नाही 'थप्पड'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'थप्पड' चा ट्रेलर सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटाची कथा एका अशा मुलीची आहे, जी पतीने केलेल्या हिणसाचाराविरुद्ध आवाज उठवते आणि त्याला घटस्फोट मागते. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हाने केले आहे आणि ट्रेलर येताच चित्रपटाच्या विषयावर चर्चा होऊ लागली आहे. मात्र सोशल मीडियावर चित्रपटाची तुलना 'कबीर सिंह' सोबत केली गेल्याने तापसी पन्नू नाराज झाली आहे. त्यानंतर तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

'कबीर सिंह' चित्रपटापूर्वी लिहिली गेली होती 'थप्पड'ची स्क्रिप्ट... 

मीडियासोबत बातचीतमध्ये तापसी म्हणाली, ''ही चुकीची गोष्ट आहे की, 'थप्पड़' 'कबीर सिंह' चित्रपटामुळे बनवला गेला आहे. मला हे ऐकून दुःख होते की, आम्ही कोणत्याही चित्रपटाला उत्तर म्हणून हा चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट 'कबीर सिंह' च्या रिलीजपूर्वी लिहिली गेला आहे. मी मानते की, चापट (थप्पड) एक सुरुवात असते पण कोणतेही नाते उलगडण्यासाठी चित्रपटात अनेक मुद्दे दाखवले गेले आहेत. मी मानते की, कबीर सिंह आणि आमच्या चित्रपटात एक समानता आहे पण पण हा चित्रपटाच्या संपूर्ण विषयाशी मिळता जुळता नाही, पण हे यापूर्वी आलेल्या चित्रपटात झाले नाही का ? असे हजारो चित्रपट बनले आहेत. ज्यामध्ये एखाद्या पुरुषाने महिलेला चापट मारली आहे. यामध्ये नवीन काय आहे ? 'कबीर सिंह' या लिस्टनवीन होता आणि त्यामुळेच लोकांनी त्याच्यासोबत तुलना सुरु केली. 

मी केले नसते 'कबीर सिंह' चित्रपटात काम...  

तापसी पुढे म्हणाली, मला वाटते की, लोकांनी चित्रपट पाहताना आपला मेंदू घरी ठेऊन नाही आले पाहिजे. 'कबीर सिंह'ने खूप पैसे कमावले आणि मी मेकर्सला यासाठी शुभेच्छा देते पण जर मला 'कबीर सिंह' मध्ये मुलीचा रोल ऑफर केला गेला असता तर मी तो कधीच केला नसता. तापसीच्या 'थप्पड़' बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये तिच्याव्यतिरिक्त पवैल गुलाटी, दिया मिर्जा, रत्ना पाठक शाह, तन्वी आजमी, कुमुद मिश्रा आणि मानव कौलदेखील दिसणार आहे. चित्रपट 28 फेब्रुवारीला रिलीज होईल.