आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : तापसी पन्नूचे म्हणणे आहे की, तिला एका चित्रपटासाठी लीड अॅक्टरच्या तुलनेत केवळ 5-10 टक्केच पैसे दिले जातात. ती नेहा धूपियाचा रेडियो शो #नोफिल्टरनेहामध्ये पोहोचली होती. जेव्हा तिला विचारले गेले होते की, अॅक्टर-अॅक्ट्रेस यांच्या फीसबद्दल होणार भेदभावामुळे तिला त्रास होतो ? तेव्हा तिने उत्तर दिले, "नक्कीच होतो. जेव्हा मला माझ्या हीरोच्या फीसच्या 5-10 टक्केच पैसेच दिले जातात. तर निश्चितपणे मला त्रास होतो."
'संपूर्ण संघर्ष नियम समान करण्याचा आहे'
तापसी पुढे म्हणते, "बॉक्स ऑफिसवरचे यश सुनिश्चित करेल की, पुसदःच्या चित्रपटासाठी मला किती पेमेंट दिले जाईल. जे हळू हळू हे अंतर कमी करण्याच्या मार्गावर चालले आहे. खूपच अयोग्य नियम आहे. केवळ आपल्याच इंडस्ट्रीमध्ये नाही, होऊ शकते की, दुसऱ्या इंडस्ट्रीजमध्येही अशीच परिस्थिती असावी. आपण येथे आहोत म्हणून आपल्याला हे जास्त दिसते. पण हा नियम प्रत्येक ठिकाणचा वेगळा असतो आणि संपूर्ण लढा याचाच आहे. याचाच संघर्ष सुरु आहे. लिंग समानतेचा हा मुद्दा आहे की, नियम समान बनवले जावे. आम्ही त्यांच्यापेक्षा जास्तही मागणी करत नाही बरोबरी मागत आहोत."
'सांड की आंख' नंतर गोष्टी बदलू शकतात : तापसी
मात्र तापसीला वाटते की, तिचा आणि भूमीचा चित्रपट 'सांड की आंख' नंतर गोष्टी बदलू शकतात. ती म्हणते, "मला आशा आहे की, 'सांड की आंख' आणि आम्हाला मिळत असलेला रिस्पॉन्स समानतेकडे जाणारा आहे. उदाहरणासाठी आमच्याकडे कोणताही मोठा महिला केंद्रित दिवाळी रिलीज चित्रपट नव्हता. मला आठवत नाही की, असे यापूर्वी कधी झाले होते?"
तापसी म्हणाली, "ते नेहमी दोन मोठ्या हिरोजसाठी रिझर्व्ह राहतात. क्लॅश दोन हीरोमध्ये होतो. जेव्हा आम्ही कॅलेंडर बघतो आणि महिला केंद्रित चित्रपटांच्या रिलीज ठरवतो तेव्हा आम्हाला उरललेल्या काही दिवसांपैकी दिवस निवडावे
लागतात. चेष्टा नाही करत आहे, खरंच कारण माझ्यासोबत बऱ्याचदा असे झाले आहे. आम्ही कॅलेंडर घेऊन बसतो आणि
मग विचार करतो अच्छा या दिवसानंतर हा आठवडा रिकामा आहे, या दिवशी करू."
तापसी पुढे म्हणते, "यामध्ये खूप निराशा होते, कारण आम्ही जास्त नाही तर बरोबरीची मेहनत करतो. आमची कथाही चांगली असते. मग आम्हाला बरोबरीची संधी का मिळत नाही? केवळ यासाठी की, हा महिला केंद्रित चित्रपट आहे ? तुम्हाला मोठी तारीख ना मिळण्यासाठी हे कारण पुरेसे आहे ? दिवाळीला आपण लक्ष्मीची पूजा करतो आणि माहित आहे, जेवढ्याही देवी आहेत, सर्वांची पूजा एका निश्चित वेळी केली जाते. मी जिंको किंवा हारो, पण बदल घडवण्यासाठी मी एक पाऊल नक्कीच उचलणार आहे."
'बदला' चित्रपटाचे श्रेयदेखील अमिताभ यांना दिले गेले...
तापसीने पुढे आपला चित्रपट 'बदला' चा हवाला देऊन सांगितले की, कथा तिच्या अवतीभोवती फिरत होती. पण जास्त श्रेय अभिनेते अमिताभ बच्चन यांना दिले गेले. ती म्हणाली, "एवढेच नाही तर जेव्हा मी 'बदला' सारखा याचित्रपट केला. यासाठी अमिताभ बच्चन यांच्यातुलनेत मी जास्त दिवस आणि सीन दिले होते. ते हीरो होते आणि मी व्हिलन. चित्रपटात हीरोच्या तुलनेत व्हिलनची उपस्थिती जास्त असते. पण जेव्हा हा रिलीज झाला तेव्हा याला अमिताभ बच्चन यांचा चित्रपट असे संबोधले गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.