• Home
  • Gossip
  • Tapasi pannu shared a teaser of film 'Sand Ki Aankh', wrote an interesting caption with it

Bollywood / 'यो तो बस सुरुआत है, क्यूँकि तन बुड्ढा होवे है मन बुड्ढा ना होवै..' या कॅप्शनसह तापसीने शेअर केला 'सांड की आंख' चित्रपटाचा टीजर  

चित्रपटात दिसणार आहे भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नूचा वयोवृद्ध अवतार 

दिव्य मराठी वेब

Jul 11,2019 06:31:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : तापसी पन्नू आणि भूमी पेडनेकर स्टारर अनुराग कश्यपचा चित्रपट 'सांड की आंख' चा टीजर रिलीज झाला आहे. यामध्ये दोन्ही अभिनेत्रीचा जबरदस्त लुक आणि अभिनय दिसत आहे. यामध्ये त्या दोन शूटर्स आजी चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमरच्या भूमिकेत आहेत. या टीजरमध्ये हेही लिहिलेले आहे की, "इस दीवाली पटाखे नहीं, बल्कि गोलियां चलेंगी." काल तापसी पन्नूने आपल्या ट्विटरवर या टीजरची एक झलक शेअर करून आउट होणार असल्याचे संकेत दिले होते.

या टीजरच्या सुरुवातीला एका लहान मुलाचा आवाज येतो, जो म्हणतो, आजींच्या खूप कहाण्या ऐकल्या असतील. पण आता मी मी माझ्या आजींची कहाणी ऐकवतो. यानंतर भूमी पेडनेकर-चंद्रो तोमर आणि तापसी पन्नू-प्रकाशी तोमर यांच्या भूमिकेत एंट्री करतात. यामध्ये तापसी पन्नू आणि भूमी पेडनेकरची हरियाणवी स्टाइलदेखील पाहण्यासारखी आहे. या चित्रपटामध्ये दोन्ही पात्रांच्या संघर्षाची आणि इथपर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या जिद्दीची कहाणी पाहायला मिळणार आहे.

तापसीने शेअर केलेला टीजर…

X
COMMENT