आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tapasi Pannu Talks About Her Upcoming Movie 'Thappad' 'It Is A Very Important Social Issue Based Film'

तापसी पन्नू आपला आगामी चित्रपट 'थप्पड' बद्दल म्हणाली - 'हा एका अतिशय महत्वाच्या सामाजिक मुद्द्यावर आधारित चित्रपट आहे' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : तापसी पन्नूने आतापर्यंत सामाजिक मुद्द्यावर बनलेल्या चित्रपटात काम करून स्वतःच्या अभिनयाच्या कक्षा विस्तारल्या आहेत. 'पिंक', 'मुल्क', 'बदला' आणि 'नाम शबाना' यांसारख्या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. पुन्हा एकदा तापसी असाच एक चित्रपट 'थप्पड' मध्ये दिसणार आहे. हादेखील एका महत्वाच्या सामाजिक मुद्द्यावर आधारित आहे. चित्रपटाबद्दल अभिनेत्रीने काही खास गोष्टी सांगितल्या.  

 

पुढच्यावर्षी वुमन्स डेला रिलीज होईल चित्रपट... 
तापसी म्हणते, 'थप्पड' एका स्पेशल सोशल मुद्द्यावर आधारित आहे. त्यामुळे हा आम्ही पुढच्यावर्षी वुमन्स डेला रिलीज करणार आहोत. हा अनुभव सिन्हा बनवत आहेत. मी त्यांच्यासोबत 'मुल्क' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान या मुडद्यावर चर्चा केली होती. त्यावेळी आमच्यकडे स्क्रिप्ट नव्हती आणि आम्ही यावर काम करू इच्छित होतो. एका वर्षानंतर स्क्रिप्ट बनून तयार आहे आणि आम्ही लवकरच याचे शूटिंग सुरु करणार आहोत. सध्या मी याबद्दल जास्त बोलू शकत नाही कारण अद्याप चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही.'

 

'मिशन मंगल' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे तापसी... 
सध्या तापसी आपला अपकमिंग चित्रपट 'मिशन मंगल' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. तापसीसोबत चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, कृति कुल्हाड़ी, नित्या मेनन आणि शरमन जोशी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची टक्कर जॉन इब्राहिमचा चित्रपट 'बाटला हाउस' सोबत होणार आहे. आधी प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट 'साहो' देखील याच दिवशी रिलीज होणार होता, पण 'साहो' च्या पोस्ट प्रोडक्शनचे काम बाकी असल्यामुळे याची रिलीज पुढे ढकलली गेली आहे. आता हा 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...