आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tapassi Pannu Was Not Offered Film 'Thappad', But This Was Her Idea; She Said 'What Kind Of Love Is That Which Has No Respect?'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तापसी पन्नूला ऑफर झाला नव्हता 'थप्पड', तर ही होती तिचीच कल्पना; म्हणाली - 'ज्यामध्ये आदरच नाही ते कसले प्रेम?'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : तापसी पन्नू अभिनीत 'थप्पड' २८ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज होईल. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या चित्रपटाची कथा अमृता नावाच्या एका महिलेची आहे. ती भर पार्टीमध्ये पतीने चापट मारल्यानंतर त्याच्याशी घटस्फोट घेते. दैनिक भास्करसोबत खास बातचीतमध्ये तापसीने या चित्रपटाच्या कल्पनेबाबत चर्चा केली. तिच्या मते, तिला कुणीच हा चित्रपट ऑफर केला नव्हता. तर ती स्वत:च या विषयावर दीर्घ काळापासून चित्रपट करू इच्छित होती. तापसी म्हणते, 'मला या मुद्द्यावर चित्रपट करायचा होता. मी 'मुल्क'च्या प्रमोशनवेळी अनुभव सिन्हा यांच्याकडे आपली इच्छा व्यक्त केली होती. असा एखादा चित्रपट तयार करत असाल तर मला याबाबत अवश्य कळवा, असे मी त्यांना म्हणाले होते. याबाबत सर मला म्हणाले होते की, माझ्या डोक्यात एक कथा घुटमळत आहे. ही कल्पना पूर्णपणे स्क्रिप्टमध्ये रूपांतरित होईल तेव्हा मी तुला ती पाठवेन. 'आर्टिकल १५' पूर्ण होताच त्यांनी मला 'थप्पड'ची स्क्रिप्ट दिली.

मारामारीवाले प्रेम मला कळत नाही

'प्रेमात चापट मारण्याला लोक सामान्य बाब मानतात. ते म्हणतात, यामध्ये थोडीफार मारामारी चालतच राहते. मात्र, असे प्रेम मला कळत नाही. एखाद्याला शारीरिकदृष्ट्या नुकसान पोहोचवेल ते प्रेम कसले? तुम्ही एखाद्याचा अपमान करत असाल, तर ते प्रेम ठरेल का? कोणताही आदर केला जात नसेल तर ते कसले प्रेम? मला हे कळत नाही का? पुरुष असो की महिला, तुम्ही आपली ताकद एखाद्यावर दाखवू शकत नाही. हे अत्यंत चुकीचे आहे. आदर हा प्रेमाचा पाया आहे. तो केला जात नसेल तर असले प्रेम फार काळ टिकत नाही.'

सर्वात जास्त घडणारा गुन्हा आहे 'थप्पड'

'आपल्याकडे 'थप्पड'ला गुन्ह्याच्या दृष्टीने बघितले जात नाही. मात्र, याकडे गुन्ह्याच्या दृष्टीने पाहिल्यास याबाबत दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या इतर गुन्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक असेल. ठीक आहे, चालतच राहते, सहन करायला शीक, असे म्हणत आपण हा मुद्दा सामान्य केला आहे. आपण चित्रपट पाहतो. आपल्या घरी ऐकतो. शेेजाऱ्यांकडे पाहतो. आवाज त्यांच्या घरातून येतात, परंतु त्यांना समजावून सांगणारे आपण कोण आहोत, असा विचार आपण करत बसतो. मी तर कधीच कुणाला चापट मारू शकत नाही. कारण मी लहानपणी चापटांचा मार खाल्ला नाही. माझ्या आई-वडिलांनी मला कधीच मारले नाही. त्यामुळे ही सामान्य बाब अाहे, असे मला वाटत नाही.'