आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tapassi Shared Photo Of Childhood, Anurag Kashyap Took A Pinch Said, 'at Least You Get Some Award'

तापसीने शेअर केला बालपणीचा फोटो, अनुराग कश्यपने फिरकी घेत लिहिले - 'चला एक तरी अवॉर्ड मिळाला' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सेलेब्रिटी अनेकदा आपल्या बालपणीचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या कलाकार आपल्या बालपणीचे फोटो शेअर करून एक महत्वपूर्ण मुद्दा पुढे अनंत आहेत. ज्याचे नाव आहे, #WhyTheGap? सेव्ह द चिल्ड्रन इंडिया' आहे. या पुढाकाराअंतर्गत वंचित मुलांची मदत केली जाईल आणि समाजात सर्वांना सामान अधिकार देण्याचा प्रयत्न केला जाईल. अभिनेत्री तापसी पन्नूनेदेखील सोशल मीडियावर सुरु असलेल्या या कार्यात भाग घेतला आहे. तिने आपल्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती शाळेतील एका खेळात पहिल्या क्रमांकावर बक्षीस घेऊन उभी दिसत आहे.   

अनुराग कश्यपने उडवली खिल्ली... 
तापसीने फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले, 'खेळ माझ्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. शाळेचे रेस ट्रॅक दरवर्षी माझ्यासाठी वॉर झोनसारखे असल्याचे, माझे कुटुंबीय आणि शाळेच्या टीचर्सला धन्यवाद म्हणू इच्छिते की, मी या उंचीवर पोहोचले पण अनेक अशी मुले आहेत ज्यांना कुणीही सपोर्ट करत नाही. त्यामुळे मी #WhyTheGap ला सपोर्ट करते.' तापसीच्या या पोस्टवर डायरेक्टर अनुराग कश्यपने फिरकी घेत लिहिले, 'चला चांगले आहे, एकतरी अवॉर्ड मिळाला...' झाले असे की, 'पिंक', 'मुल्क', 'बदला' यांसारख्या चित्रपटात उत्तम परफॉर्मन्स दिल्यानंतरही तापसीच्या वाट्याला अपक्षेप्रमाणे एकही अवॉर्ड आला नाही. त्यामुळे अनुरागने अशी फिरकी घेतली.  

तापसीनेदेखील दिले उत्तर... 
तापसीनेदेखील अनुरागला मजेशीर उत्तर दिले. तिने लिहिले, 'हाहाहा, शाळा, कॉलेज सर्व ठीक होते. आयुष्यात त्यानंतरच कॉम्पिटिशन खूप वाढले.' तापसीच्या पोस्टवर विक्की कौशलनेदेखील कमेन्ट करून लिहिले, 'नक्कीच दोघं तिघांना तर धुवून मारले असशील.'   

तापसीला अक्षयने केले होते नॉमिनेट... 
तापसीला #WhyTheGap चॅलेंजसाठी अक्षयने नॉमिनेट केले होते ज्याला ट्विंकल खन्नाने नॉमिनेट केले होते. अक्षयनेदेखील आपल्या टीनएज वयातील एक फोटो शेअर करून लिहिले होते, 'जेव्हा मी मोठा होत होतो तेव्हा, खेळाची मला खूप आवड होती. माझी आई माझ्या खाण्यापिण्याचे विशेष ध्यान ठेवायची. पण असे नशीब प्रत्येक मुलाचे नसते. रस्त्यावर फिरत असलेल्या मुलांना पोटभर हायला अन्न मिळत नाही. 11,72,604 एवढ्या मुलांना तर दिवसातून एकदाची अन्न मिळत नाही. त्यामुळे आता हा विचार करण्याची वेळ आहे कि, #WhyTheGap?'

बातम्या आणखी आहेत...