Home | Gossip | Tara Sutariya denied the news of dating Siddharth Malhotra, said - 'our chemistry is very nice'

तारा सुतारियाने केले सिद्धार्थ मल्होत्राला डेट करण्याच्या बातम्यांचे खंडन, म्हणाली - 'आमची केमिस्ट्री खूप छान आहे' 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 29, 2019, 03:30 PM IST

'मरजावां' मध्ये एकत्र काम करत आहेत सिद्धार्थ-तारा... 

  • Tara Sutariya denied the news of dating  Siddharth Malhotra, said - 'our chemistry is very nice'

    बॉलीवुड डेस्क : 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' ने बॉलिवूड डेब्यू करत असलेली तारा सुतारियाचे नाव सिद्धार्थ मल्होत्रासोबत जोडले जात आहे. याबाबत आता स्वतः ताराची प्रतिक्रिया समोर आली आहे. एकीकडे जिथे ताराने सांगितले की, ती सिद्धार्थला डेट करत नाहीये तर दुसरीकडे तिने हेही मान्य केले की, त्यांच्यामध्ये चांगली केमिस्ट्री आहे. ती एका एफएमवर 'स्टुडंट ऑफ द इयर'ला प्रमोट करण्यासाठी पोहोचली होती. यादरम्यान तिने सिद्धार्थला डेट करण्याच्या प्रश्नावर उत्तर दिले, "नाही, आम्ही एकमेकांना डेट करत नाही आहोत. तो माझा शेजारी आहे आणि शेजारी शेजाऱ्यांमध्ये प्रेम तर असतेच ना. म्हणजे का नाही. पण आम्ही केवळ चांगले मित्र आहोत."

    'मरजावां' मध्ये एकत्र काम करत आहेत सिद्धार्थ-तारा...
    सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया फिल्म 'मरजावां' मध्ये एकत्र काम करता हेत, जी 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. जेव्हा इंटरव्यूमध्ये या फिल्मउल्लेख झाला तर ताराने दोघांच्या केमिस्ट्रीविषयी सांगितले. "फायरवर्क्स तर आहे." 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' 10 मेला रिलीज होत आहे. पुनीत मल्होत्राच्या डायरेक्शन आणि करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या फिल्ममध्ये टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडेयांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

Trending