आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tara Sutariya Replied To The Trollers, Said 'Family Members Laugh A Lot After Reading The Comments'

तारा सुतारियाने ट्रोलर्सला दिले उत्तर, सांगितले - कमेंट्स वाचून खूप हसतात कुटुंबीय 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'मरजावां' फेम अभिनेत्री ताराने काही दिवसांपूर्वी एका पार्टीमध्ये ट्यूब टॉप घातले होते, त्यानंतर ती सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली होती. अशातच ताराने एका मुलाखतीदरम्यान ट्रोलर्सला उत्तरदिले. तारा म्हणाली, 'हा माझ्या कामाचा भाग आहे. अनेकदा माझे पेरेंट्स सोशल मीडियावर माझ्याबद्दल आलेल्या कमेंट्स वाचत आपला संपूर्ण दिवस काढतात. 


लोक कदाचित कमेंट्स करून खुश होत असतील. पण माझे पेरेंट्स माझ्याबद्दल केलेल्या कमेंट्स वाचतात आणि खूप हसतात. अखेर माझे कामाच लोकांशी जोडले गेलेले आहे, त्यामुळे हा माझ्या कामाचाच एक भाग आहे. माझे लक्ष क्वालिटी वर्क डिलिव्हर करण्यावर आहे.' ताराला अशातच 'मरजावां' चित्रपटातील तिच्या रोलसाठीही खूप ट्रोल केले गेले होते. 


यावर तारा म्हणते, 'बाहेरच्या लोक चित्रपटांना एका ग्लॅमरस इंडस्ट्री म्हणून पाहतात. पण यामध्ये राहन्यासाठी खूप काम करावे लागते. आधी मी यामुळे खूप जास्त प्रभावित व्हायचे. डिप्रेशनमध्ये जायचे. पण आता मी या गोष्टींना माझ्या जास्त गंभीरतेने घेत नाही. जोपर्यंत माझा तिसरा चित्रपट 'आरएक्स 100' रिमेक येईल तोपर्यंत मी या गोष्टी हॅण्डल करणे शिकले असेल.'

बातम्या आणखी आहेत...