आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... अन् ‘तारक मेहता’तील चंपक चाचांचा माफीनामा; 'मुंबईची भाषा हिंदी’च्या संवादावरून झाला वाद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : छोट्या पडद्यावर गाजलेल्या “तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील चंपक चाचा अर्थात अमित भट यांनी मंगळवारी जाहीर माफी मागितली. मुंबईत सामान्यांची भाषा हिंदी असल्याचा एक संवाद सोमवारच्या भागात चंपक चाचाच्या तोंडी होता. यावरून मनसे कार्यकर्ते भडकले. मुंबईची भाषा मराठीच असल्याचे सांगत मनसेने या मालिकेचे शूटिंग बंद पाडण्याची धमकी दिली होती. अखेर, अमित भट यांनी माफी मागितली आणि वादावर पडदा पडला.

चंपक चाचाच्या तोंडी मुंबईकरांची भाषा हिंदी असल्याचा डायलॉग सोमवारी व्हायरल झाला होता. त्यामुळे संतापलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मालिकेचे निर्माते व कलाकार जोवर मराठी माणसाची माफी मागत नाहीत तोवर शूटिंग बंद पाडण्याची धमकी दिली होती.
 

बातम्या आणखी आहेत...