आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तारक मेहता...’मधील अभिनेत्री प्रिया आहुजाला पुत्ररत्न, फोटो शेअर करुन सांगितली गोड बातमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत रिटा रिपोर्टर ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा राजदा ही आई झाली आहे. 27 नोव्हेंबर रोजी तिने मुलाला जन्म दिला. प्रियाने आपण आई झाल्याचे इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन सांगितले.

या फोटोमध्ये मुलाचे पाय दिसत आहेत.  फोटो शेअर करुन प्रियाने लिहिले,  ‘आमचे घर दोन पायांनी वाढले आहे. आमच्या घरी मुलाचा जन्म झाला आहे. आम्ही खूपच आनंदी आहोत. आमच्या मुलाचा जन्म 27 नोव्हेंबरला झाला असून ही गोष्ट सांगण्यास मला खूपच आनंद होत आहे.’ प्रियाने ही पोस्ट शेअर करताच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला. 

प्रियाने याचवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या गरोदरपणाबद्दल सांगितलं होतं. तिने आपल्या पतीबरोबर काही स्पेशल फोटो सोशल मीडियावर शेअर करत याविषयी माहिती दिली होती. यावेळी तिचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते. त्याशिवाय तिने खास लिपलॉक करत ही गोड बातमी सांगितली होती. तसंच आपलं कुटुंब आता वाढणार असून चाहत्यांचंं प्रेम आणि आशिर्वाद हवं असल्याचंही तिने त्यावेळी नमूद केलं होतं. इतकंच नाही प्रियाने काही दिवसांपूर्वी प्रियाने आपले गरोदरपणातील फोटो पोस्ट करत हेदेखील म्हटलं की, ‘बाळाची वाट पाहणं हे एखाद्या एअरपोर्टवर येऊन कोणाची तरी वाट पाहण्यासारखं आहे. तुम्हाला माहीत नाह की कोण येणार आहे, कसं दिसणार आहे आणि  कोणत्या वेळी फ्लाईट लँड होणार आहे’ प्रियाने याचवर्षी ऑगस्ट महिन्यात ती आई होणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.  प्रियाने पती मालवसोबत खास प्रेग्नेंसी फोटोशूटदेखील केले होते.  या फोटोशूटमध्ये प्रियाच्या चेह-यावर आई होणार असल्याचा आनंद स्पष्ट झळकला.  

प्रियाचे लग्न गुजराती दिग्दर्शक मालव राजदा यांच्यासोबत झाले आहे. मालव राजदा हे ‘तारक मेहता उल्टा चष्मा’चे चीफ डायरेक्टर आहेत. या कार्यक्रमाच्या सेटवर प्रिया आणि मालवची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि नंतर त्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये लग्न थाटले.