कन्फर्म : ‘तारक / कन्फर्म : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ला दिशा वाकानीने केले अलविदा, आता नाही करणार सीरियलमध्ये काम

दिशाने 2015 मध्ये मुंबईच्या एक चार्टर्ड अकाउंटंट मयूर पाटियासोबत केले होते लग्न... 

दिव्य मराठी वेब टीम 

Jan 23,2019 01:07:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ची सर्वात आवडती आणि लाडकी दया बेन म्हणजेच दिशा वाकानीने फायनली शोला अलविदा म्हणले आहे. मागच्या दीड वर्षांपासून ती शोमध्ये दिसत नव्हती. दिशा आई झाल्यानंतरच शोपासून दूर झाली होती. पण मागच्यावर्षी तिच्या कमबॅकच्या बातम्या चर्चेत होत्या. निर्माते आणि चॅनेलने त्यांना परत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले.

मेकर्सने फीस वाढवून देण्याचीही दिली होती ऑफर...
सोनी सबवर येणारा काॅमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये दिशा, दयाबेनची भूमिका निभावत होती. मेकर्सने तिला जास्त पेमेंटचीही ऑफर दिली होती. मात्र तरीही तिने परत यायला नकार दिला आहे. असेही सांगितले जात आहे की, दिशाने चॅनेलला तिचे कॉन्ट्रॅक्टही संपवण्याचे सांगितले आहे. फायनली प्रोड्यूसर असित मोदीने दिशाशियावच पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच शोमध्ये आणखी दोन पात्रांची एंट्री होणार आहे.

चित्रपट आणि सीरियल्समधेही दिसली आहे दिशा...
दिशा 'तारक मेहता का उल्टा चश्मा' व्यतिरिक्त आणखी काही सीरियल जसे खिचड़ी आणि CID मधेही दिसली आहे. त्याबरोबरच फिल्म जोधा-अकबर, देवदासमधेही दिशाने काम केले आहे. पण या सर्व चित्रपट आणि सीरियल्समध्ये दिशाच्या कामाला कुणीही नोटिस केले नाही.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ने मिळाली ओळख...
तिला खरी ओळख मिळाली ती सीरियल 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ने. 2008 मध्ये ही सीरियल सुरु झाली होती. दिशा सुरुवातीपासूनच सीरियलमध्ये 'दयाबेन' ची भूमिका निभावत होती. या सीरियलने दिशाला नवी लोकप्रियता मिळवून दिली. टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या पाचव्या सर्वात दीर्घ सीरीजचा पुरस्कारही या सीरियलला मिळाला आहे.

X
COMMENT