आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tariq Anwar, The Founding Member Of NCP, Joined The Congress Again After 19 Years

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य तारिक अन्वर 19 वर्षांनी पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य माजी मंत्री तारिक अन्वर यांची शनिवारी घरवापसी झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी १९ वर्षांनंतर पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रफाल विमान खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली होती.

 

यावर नाराजी व्यक्त करून अन्वर यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा व खासदारकीचा राजीनामा दिला होता. अन्वर यांना काँग्रेसकडून बिहारमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...