आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजप्रताप यादवांच्या सुरक्षारक्षकांनी पत्रकाराला केली मारहाण; तेजप्रताप यादव म्हणाले - मला जीवे मारण्याचा केला प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान सुरू आहे. यादरम्यान अनेक ठिकाणांहून हिंसाचाऱ्याच्या बातम्या समोर येत आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांच्या सुरक्षारक्षकांनी एका वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेनंतर माझ्यानंतर जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याचे तेजप्रताप यादव यांनी सांगितले. 


या प्रकरणानंतर तेजप्रताप यादवने ट्वीट करत सांगितले की, आज मतदान केल्यानंतर मतदान केंद्रातून बाहेर येतेवेळेस माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये माझ्या गाडीचे नुकसान झाले असून आमचा चालक आणि सुरक्षारक्षकांना गंभीर मार लागला आहे. याबाबत तेजप्रताप यादवांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

 

 


दरम्यान तेजप्रताप यादव घरातून बाहेर निघाल्यानंतर त्यांच्या गाडीच्या चाकाखाली कॅमेरामनचा पाय आला. यामुळे त्याने आपला कॅमेरा गाडीच्या काचेवर मारला. त्यात गाडीचा काच फुटला. यानंतर येथील सुरक्षारक्षकांनी तेथे उपस्थित असलेल्या पत्रकरांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.