आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

....अशा राजकारणाचे गोत्र कोणते?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांनी नेहमीच रामजन्मभूमीवर मंदिर बांधकामास विरोध केला, रामसेतूची थट्टा उडवली, तो पाडून समुद्रातील जहाजांसाठी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला, ज्या पक्षाच्या नेत्यांनी केरळमध्ये गायीचे छाटलेले मुख भर बाजारातून फिरवले, आज ते स्वत:ला ब्राह्मण कुळातील गोत्राचे सनातनी म्हणवत आहेत. हा कोणता राजकीय धर्म म्हणावा? काहीही वदवून घ्या, काहीही करून घ्या, पण कृपया मते द्या. देश, धर्म, सुरक्षा, विकासाशी आमचे फक्त काही काळापुरतेच नाते आहे. जसे वर्तमानपत्र आणि प्रिंटिंग प्रेसचे शाईशी काही क्षणांचे नाते असते. 
देशाचा एक आत्मा, एक मनही आहे. जे रस्ते, पाणी, वीजपुरवठ्यापुढे जाऊन नेतृत्वाची कार्यशैली, दर्जा आणि गंभीरतेच्या आधारे विकसित होत राहते. एखाद्या समाजाचे मनोबल कधी खचते किंवा केव्हा वाढते, हे तेथील जनतेच्या भावनांद्वारे कळते. भाजपसाठी आसेतु हिमाचल नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व एखादा चमत्कार असल्यासारखे आकर्षण निर्माण करत असेल तर हा मिथ्य प्रचार समजावा का? ३५ वर्षांनंतर प्रत्येक पैलूची तपासणी करून देश जगात सर्वोत्कृष्ट अशा विमानांची खरेदी करत असेल तर त्याला विरोध हा कोणत्या राजकारणाचा परिपाक म्हणावा? देशातील ग्रामीण भागात, जिथे १८-१८ तास वीज गायब असायची, तेथे २४ तास प्रकाश, जेथे रस्ते नव्हते तेथे ऐसपैस रस्ते, ज्या नद्यांमध्ये पोहणे अशक्य होते, तेथे स्वच्छतेनंतर जलस्रोत अवतरणे, जेथे कुटुंबातील सदस्य, महिला- मुले असुरक्षितता अनुभवत होते, तेथे रात्री-अपरात्रीदेखील महिला बिनधास्तपणे फिरतात, हे सर्व एखाद्या 'मनहूस' व्यक्तीचे द्योतक आहे का 'मनहूस' विरोधी पक्षाचे? 

 

एकेकाळी विदेशी आक्रमक शक्ती, सत्तालोलुप राजे तसेच सामंतांच्या मदतीने आपल्याला गुलाम बनवण्यात, लूट करण्यात तसेच नरसंहार करण्यात यशस्वी होत असत, त्या काळाचे कदाचित आपल्याला विस्मरण झाले असावे. आज भारतीयांना आठवावे लागेल की, हजारो मैल अंतरावर गझनी नामक ओसाड गावाचा महमूद सिंधी राजपुतांच्या गुजरातेतील सौराष्ट्रातून पुढे कूच करत प्रभास-पाटणपर्यंत आला होता. नकाशात पाहून थोडा अंदाज लावा की कुठे गझनी आणि कुठे प्रभास-पाटणचे सोमनाथ मंदिर. कुणी क.मा. मुन्शी यांनी लिहिलेली 'जय सोमनाथ' ही महान कादंबरी वाचली नसेल, त्यांनी ती अवश्य वाचावी. सगळे काम सोडून ती अभ्यासा. त्यानंतर भारताच्या वर्तमान स्थितीवर टिपणी करण्याचे धाडस करा. 

 

पराक्रमी हिंदू सैनिक गझनीकडून पराभूत झाले. कारण सत्तालोलूप, महत्त्वाकांक्षी अशा आपल्याच लोकांनी देश, धर्माची पर्वा न करता विदेशी, अधर्मी लोकांची मदत केली. लुटलेले सामान, हिंदू स्त्रिया, गुलाम हे सर्व घेऊन गझनी परतला. मूठभर इंग्रज कोट्यवधी भारतीयांवर का राज्य करू शकले? या प्रश्नाचे उत्तर सध्याच्या राजकारणातील अराजकात शोधता येईल. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप या तपोनिष्ठ, समर्पित विचारसरणीसाठी जीवन समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्यांनी बनलेल्या संघटना यांनी नेहमीच भारतमातेला सर्वोच्च देवता मानले आहे. या कार्यकर्त्यांची फौज संपूर्ण देशभर पसरलेली आहे. ही अनेक पिढ्यांपासून केवळ हिंदुत्व, राष्ट्रीयता, भारतीय धर्माची तपश्चर्या करण्यात आपले जीवन व्यतीत करत आहे. देशातील हा एकमेव पक्ष असा आहे, जो भारतीय समाज आणि संस्कृती हीच आपले आराध्य दैवत असल्याचे मानते. जेथे ग्रामीण पातळीवर शाखांमध्ये निवडणूक होते. जेथे संघटित कार्यकर्तेही असंघटित काम करून दाखवतात. कुणीही पुरस्कार, बक्षिसाची आशा बाळगत नाही. जेथे अनुसूचित जाती-जमाती, निम्न स्तरावरील झोपड्यांमध्ये शिक्षण, संस्कार, चिकित्सा इत्यादी अनेक सेवा कार्य देणारे नि:स्वार्थी तरुण मिळतात. त्यांच्यावर कुणी शिवीगाळ केल्याचे आरोप लावत असतील तर हे देशाचे दुर्दैव नव्हे तर आणखी काय आहे? स्वातंत्र्यानंतर प्रथमच भ्रष्टाचारविरहित प्रशासन, वेगवान सरकारी काम, नवनवीन भागात रेल्वेमार्ग, विमानतळे, शत्रूला सडेतोड उत्तर देणाऱ्या कारवाया तसेच देशांतर्गत सुरक्षेला भगदाड पाडणाऱ्या नक्षली माओवाद्यांवर कठोर कारवाई झाली. देशांतर्गत आणि परराष्ट्र पातळीवरही देशाचे ठराविक धोरण आहे, हे जनतेला प्रथमच अनुभवायला मिळत आहे. प्रथमच देशात अभूतपूर्व असा वस्तूसंग्रह उभारला जात आहे. म्हणजेच भविष्यात विकासासाठी अधिक सामग्री, प्रथमच विदेशात देशाची प्रतिमा उंचावली आहे. जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये घसरण होत असताना केवळ भारताचीच आर्थिक स्थिती वेगाने प्रगती करत आहे. ज्यांच्या डोळ्यासमोर देशहित नाही, जे खुर्चीच्या मोतीबिंदूनी ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी हा सर्व एखाद्या विनोदाचा विषय असू शकतो. 

 

नरेंद्र मोदी हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या परंपरेतील नेते आहेत. या परंपरेतील नेत्यांनी शासन तसेच राजकीय व्यवस्था हेच आपले जीवन आहे, असे समजून कार्य केले. संवेदना हा त्यांच्या महान कार्याचा आधार आहे. त्यांच्यासाठी कुणीही गैर नव्हते. त्यांनी एवढे उच्चस्थान कधीही मागितले नाही, जेथे केवळ बर्फ असावा आणि चिमणीलाही तेथे घरटे बांधता येऊ नये. त्यांच्या मते, मोठे होणे याचा अर्थ अधिक नम्र आणि सावली देणारा वृक्ष असा आहे. माणूस आणि माणूसपण जगण्याचा अर्थ त्यांनी शिकवला. त्यांची मैत्री, त्यांच्या संबंधांना सीमांचे बंधन नव्हते. त्यांच्या आत्मीयतेलाही मर्यादा नव्हत्या. शत्रूसाठी क्षमा नाही, हेच त्यांचे तत्त्व होते. शांततेसाठी सीमोल्लंघन करण्याचीही त्यांची तयारी होती. त्यांनी पोखरण-२ वेळी जगाला आश्चर्यचकित केले. सुपर कॉम्प्युटर बनवले, पण देशाच्या सुरक्षेशी कधीही तडजोड केली नाही. मनात आले असते तर त्यांनी युद्धही केले असते. आपल्या सशस्त्र सैन्यावर त्यांचा विश्वास होता. पण त्यांनी व्यर्थ अहंकार दर्शवला नाही. विकासावर लक्ष केंद्रित केले. भारतीय मतदारांनी लक्षात ठेवावे, एक वेळ आम्ही राहणार नाहीत, हा पक्ष, या विचारसरणीत परिवर्तन होईल, पिढ्यांही बदलतील, पण भारत देश अटल, अमर सनातनच राहील. आपण भारताला सत्य, समृद्ध, सशक्त, समर्थ देश बनवण्यासाठी सदैव प्रयत्न करुयात. भारताचे अस्तित्व असेल तरच आपले अस्तित्व असेल. 

 

२०१९ मधील निवडणुकीत आमच्यासमोर हीच आव्हाने आहेत. सध्याच्या सभांमध्ये जे काही बोलले- ऐकले जात आहे, ते सर्व तात्कालिक घटना पकडण्याचे प्रयत्न आहेत. पण देश दीर्घकालीन, स्थैर्य आणि पारदर्शकता या आधारेच चालतो. तुकड्या-तुकड्यांनी बनलेले युतीचे राजकारण आणि तुकड्या-तुकड्यांचे अधांतरी सरकार चीन आणि पाकिस्तानसारख्या आव्हानांना तोंड देण्यास तसेच मजबूत अर्थव्यवस्था निर्माण करण्यात कदापि समर्थ नसेल. चीनने तांगश्याओ फंग यांचे मुक्त धोरण स्वीकारल्यानंतर सलग तीस वर्षे स्थैर्य, एक लय, एक मन व एक रंगाची सत्ता व्यवस्था उभी केली. याद्वारेच जगात महासत्ता बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. सध्याच्या स्थितीत देश जर अस्थिर मुद्द्यावर, अनुभव नसलेल्या, दिशाविहीन, भ्रष्ट, परस्पर-विरोधी विचारसरणीच्या पक्षांच्या हाती दिल्यास आपण कधी रसातळाला जाऊ, हे समजणारही नाही. ७० वर्षांमध्ये देश स्थिर नेतृत्व आणि राष्ट्रीयतेचा आधार असलेल्या पक्षांकडून चालवला असता तर आज देश रशिया आणि अमेरिकेच्याही पुढे असता. सुदैवाने, जनतेने आज पुन्हा मोदींच्या नेतृत्वाकडे भारताला महासत्ता बनवण्याची संधी दिली आहे. अनेक शतकांपासूनची मरगळ आणि दारिद्ऱ्य झटकून देण्याची ही संधी आहे. ती गमावावी, असे कुणा भारतीयाला वाटेल का? 

 

सध्याच्या सभांमध्ये जे काही बोलले- ऐकले जात आहे, ते सर्व तात्कालिक घटना पकडण्याचे प्रयत्न आहेत. पण देश दीर्घकालीन, स्थैर्य आणि पारदर्शकता या आधारेच चालतो. तुकड्या-तुकड्यांनी बनलेले युतीचे राजकारण आणि तुकड्या-तुकड्यांचे अधांतरी सरकार चीन आणि पाकिस्तानसारख्या आव्हानांना तोंड देण्यास तसेच मजबूत अर्थव्यवस्था निर्माण करण्यात कदापि समर्थ नसेल. 

बातम्या आणखी आहेत...