आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दिवसाच्या पिछाडीनंतर टाटा पुन्हा सर्वात मोठा कॉर्पोरेट समूह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- केवळ एक दिवस मागे गेल्यानंतर टाटा समूह गुरुवारी पुन्हा देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट समूह बनला आहे. गुरुवारी बंद बाजारभावाच्या दृष्टीने टाटा समूहाचे बाजार मूल्य १०.४५ लाख कोटी रुपये, तर एचडीएफसी समूहाचे १०.४४ लाख कोटी रुपयांवर होते. बुधवारी एचडीएफसी समूहाने टाटाला मागे टाकले होते. कंपनी मूल्य १०.४० लाख कोटी, तर टाटा समूहाचे १०.३८ लाख कोटी रुपये होते. एचडीएफसी समूहामध्ये पाच, तर टाटा समूहामध्ये २५ नोंदणीकृत कंपन्या आहेत.  

 

यावर्षी सप्टेंबर महिन्यात टाटा समूहाचे बाजार मूल्य एचडीएफसी समूहाच्या तुलनेमध्ये २.५ लाख कोटी रुपयांनी जास्त होते. मात्र, नंतरच्या काळात समूहाच्या अनेक प्रमुख कंपन्यांचा मार्केट कॅप कमी झाला आहे. एचडीएफसी समूहाचा मार्केट कॅप पहिल्यांदाच १० जुलै रोजी १० लाख कोटी रुपयांच्या वर गेला होता.  

 

टीसीएसच्या शेअरमध्ये यावर्षी ४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. टीसीएसला सोडल्यास या वर्षी टाटा समूहाचे बाजार मूल्य जवळपास २५ टक्क्यांनी कमी झाले आहे. समूहातील आठ कंपन्या सोडल्यास उर्वरित सर्व कंपन्यांचे मूल्य कमी झाले आहे. टाटा मोटर्समध्ये सर्वाधिक ६० टक्क्यांची घसरण झाली आहे. टाटा स्टील २५ टक्के, टाटा पाॅवर १९ टक्के, तर व्होल्टासमध्ये १६ टक्क्यांची घसरण झाली आहे.  

 

किरकोळ कर्जावर लक्ष केंद्रित केल्यामुळे एचडीएफसी बँकेचा एनपीए अत्यंत कमी आहे. त्यामुळे देशांतर्गत विदेशी गुंतवणूकदारांकडून या कंपनीच्या शेअरला चांगली मागणी आहे. २०१६ मध्ये कंपनीच्या शेअरमध्ये ११ टक्के, तर २०१७ मध्ये ५५ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. या दोन वर्षांत सेन्सेक्स २ टक्के आणि २८ टक्के वर गेला होता. एचडीएफसी समूह हा त्या मोजक्या ब्लूचिप कंपन्यांमधील एक आहे, ज्यांचा मालकी अधिकार एखाद्या संचालक कुटुंबाकडे नाही, तर प्रोफेशनलच या समूहाचे संचालन करतात.

 

या वर्षी टाटा समूहाच्या मूल्यात ८ टक्के, तर एचडीएफसीत २२ टक्के वाढ  
- टाटा समूहाचे बाजार मूल्य या वर्षी ८ टक्क्यांनी वाढले. समूहाच्या एकूण मूल्यामध्ये टीसीएसची भागीदारी सुमारे ६८ टक्के आहे.  
- एचडीएफसी समूहाच्या बाजार मूल्यात या वर्षी २२ टक्क्यांची वाढ झाली. समूहाच्या मूल्यात एचडीएफसी बँकेची भागीदारी ५५ टक्के आहे.  
- ५० प्रमुख तज्ज्ञांपैकी ९० टक्के तज्ज्ञांनी एचडीएफसी बँकेला बाय रेटिंग दिली आहे. त्याचबराेबर टीसीएसला ५० टक्के बाय रेटिंग दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...