आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेस्टीव्ह सिझनमध्ये खरेदी करा टाटा ची ही कार, 1 लाख रुपयांपर्यंतचा होईल फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टाटा मोटर्सने फेस्टीव्ह सिझनमध्ये कार खरेदी करणाऱ्यांसाठी स्पेशल फेस्टीव्ह कॅम्पेनची घोषणा केली आहे. या कॅम्पेनअंतर्गत टाटाने एका कारच्या खरेदीवर जवळपास 1 लाखांचे गिफ्ट ऑफर केले आहेत. यामध्ये तनिष्क व्हाऊचर, आयफोन एक्स, टॅबलेट, 32 एलईडी टीव्ही यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच ग्राहकांनी कोणतीही पॅसेंजर व्हेइकल खरेदी केल्यास प्रत्येक आठवड्याला टाटा टिगॉर जिंकण्याचीही संधी दिली जाईल. 

 

31 ऑक्टोबरपर्यंत संधी 
या ऑफरची घोषणा करताना टाटा मोटर्सचे व्हाइस प्रेसिडेंट (सेल्स, पॅसेंजर व्हेइकल्स) एस.एन. बर्मन म्हणाले की, ही ऑफर  31 ऑक्टोबरपर्यंत असेल. फेस्टीव्ह सिझनमध्ये टाटाच्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर हास्य असावे हाच त्यांचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले. ग्राहकांना यावर्षी जास्तीत जास्त फायदा मिळावा अशी कंपनीची इच्छा आहे. त्यासाठी कंपनीने फेस्टीव्हल ऑफ गिफ्ट कॅम्पेन सुरू केले आहे. बर्मन म्हणाले की, कंपनीच्या या कॅम्पेनमुळे ग्राहकांची इच्छाशक्ती वाढेल, तसेच ब्रँडशी अधिकाधिक लोक जोडले जातील. 

 
दर आठवड्याला जिंका टाटा टिगॉर 
दर आठवड्याला टाटा टिगॉर जिंकण्याची संधीही आहे. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला टाटाची कोणतीही गाडी खरेदी करणाऱ्याला स्क्रैच कूपन दिले जाईल. त्याचा ड्रॉ दर आठवड्याला निघेल. 

 
अॅप डाऊनलोड करा 
फेस्टीव्ह गिफ्टसाठी तुम्हाला Play Store वरून 'फेस्टीव्हल ऑफ गिफ्ट' अॅप डाऊनलोड करावे लागेल. तसेच या ऑफरचा लाभ घेण्यासाठी वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. 


एवढा फायदा होईल 
Tata Tiago ची दिल्लीतील स्टार्टींग प्राइज जवळपास 3 लाख 40 हजार आहे. या सिझनमध्ये त्यावर 40 हजारांपर्यंतचे फायदे मिळू शकतात. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे बेनिफिट मिळतील. 

 
 

बातम्या आणखी आहेत...