Home | Business | Business Special | Tata Motors can become a driver by buying 'ACE Gold'

टाटा मोटर्स ‘एसीई गोल्ड’ खरेदीने चालक बनू शकताे मालक

दिव्य मराठी | Update - Nov 07, 2018, 09:31 AM IST

टाटा मोटर्स एससीव्ही कार्गो परिवारातील “एसीई गोल्ड’ या नव्या मॉडेलने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे.

  • Tata Motors can become a driver by buying 'ACE Gold'

    मुंबई - दमदार इंजिन, अत्याधुनिक मॉडेल, सर्वाधिक फायदा यामुळे टाटा मोटर्सने आजपर्यंत चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. टाटाच्या प्रत्येक मॉडेलने कमाल फायदा मिळवून देऊन ग्राहकांची मने जिंकली आहेत. टाटा मोटर्स एससीव्ही कार्गो परिवारातील “एसीई गोल्ड’ या नव्या मॉडेलने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. नवीन व्यवसायाचा शुभारंभ करण्यासाठी दीपावलीच्या शुभमुहूर्तावर “एसीई गोल्ड’ची वाहन खरेदी फायद्याची ठरेल.

    दमदार कामगिरी, दणकटपणा, वाढीव सुरक्षा व आरामदायीपणा यांचा मिलाफ असलेली “टाटा एसीई गोल्ड’ ग्राहकांचे जीवनमान उंचावणारी, रोजगारनिर्मितीची संधी देणारी व तरुणांना उद्योजक बनवण्याकरिता प्रेरित करणारी गाडी ठरली आहे. कमी खर्चात सर्वाधिक मोबदला देणारे वाहन व देखभाल दुरुस्तीसाठी सोपी अशी महत्त्वाची वैशिष्ट्ये “टाटा एसीई गोल्ड’ची आहे. पुढील बाजूचा आकर्षक लूक असलेला दर्शनीय भाग, सुधारित अॅर्गोनॉमिक्ससह स्टिअरिंग व्हील आणि उपयुक्ततापूर्ण डॅशबोर्ड अशी दमदार गुणवैशिष्ट्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरणारी आहेत. उद्योजकांसाठी तसेच मार्केटमधील वजनी वाहतूक करणाऱ्यांसाठी “टाटा एसीई गोल्ड’ परिपूर्ण मानली जाते. “टाटा एसीई गोल्ड’ने छोट्या व्यावसायिक वाहनांच्या विभागात अष्टपैलू कामगिरी करत सर्वोत्तम स्थान पटकावले आहे.

    “टाटा एसीई गोल्ड’सोबत व्यवसायाची सुरुवात करून चालक एका दिवसात मालक बनू शकतात. एसीई खरेदीसाठी आरटीओ इन्शुरन्सह सर्वात कमी डाऊन पेमेंट रु २०९९९/-* असून एक्स शोरूम किंमत रुपये ३.८२* लाखांपासून पुढे आहे. ‘एसीई गोल्ड’ वर १००% कर्ज सुविधा आहे. व जुन्या वाहनांवर एक्स्चेंज सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती टाटा मोटर्सचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्रेणिक गांधी यांनी दिली.

Trending