आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता 'OLA-UBER'ला जास्तीचे पैसे द्यायची नाही गरज; टाटा मोटर्सने ग्राहकांसाठी आणली आहे खास ऑफर, पाहा काय आहे ही सुविधा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- तु्म्ही कार खरेदी करण्यात लाखोरुपयांची गुतंवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. टाटा मोटर्स कंपनीने सामान्य लोकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. कदाचित या ऑफरविषयी ऐकल्यावर तुमचा कार खरेदी करण्याचा विचार बदलू शकतो. टाटा मोटर्सने झुमकार (Zoomcar)सोबत भागिदारी केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना भाड्याने कार घेता येणार आहे. सध्या कंपनीने 500 इलेक्ट्रिक टिगोर कार उपलब्‍ध केल्या आहे.  

 

झुमकार देत आहे 500 कारची डिलेव्हरी
देशभरात झुमकारची सेवा सुरू करण्यासाठी टाटा मोटर्सने पुण्यातील कॉनकोर्ड मोटर्समधून 500 इलेक्ट्रिक कार तयार केल्या आहे. सुरवातीला झुमकार देशातील 20 मोठ्या शहरांत आपली सेवा देणार आहे.  

 

कशाप्रकारे मिळेल ही सुविधा

झुमकारची इलेक्ट्रिक कार सेल्फ ड्रिवन रेंटल प्लॅटफॉर्मवर उपलब्‍ध होणार आहे. म्हणजे कारला भाडे तत्वावर खरेदी करणाऱ्या व्यक्तीलाच ती कार ड्राइव्ह करुन न्यावी लागणार आहे.   

 

काय आहे झुमकारची योजना
झुमकारने याआधी महिंद्रा कंपनीसोबत भागीदारी केली होती. त्याअंतर्गत दिल्लीत झुमकारची सुविधा देण्याचे निश्चित झाले होते. तेव्हा 30 ते 40 रुपये प्रतितास दराने या इलेक्ट्रिक कारचे भाडे आकरण्यात आले होते. त्याशिवाय कारला घरी बोलवायचे असेल तर त्यासाठी कंपनी अतिरिक्त  100 रुपये भाडे आकारत होती.  

 

बातम्या आणखी आहेत...