आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TATA ने सुरु केली आपल्या सर्वात लग्जरी कारसाठी बुकिंग, 5 आणि 7 सीटर अश्या दोन प्रकारात असेल उपलब्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - टाटा मोटर्सने आपल्या शक्तिशाली SUV हॅरियरचे (Harrier) ची पूर्व बुकिंग सुरु केली आहे. कंपनीने ट्विट मार्फत हि बातमी प्रसिद्ध केली असून. ट्विट मध्ये असे नमूद केले की,  "टाटा हॅरियरची बुकिंग सुरू झाली आहे. ही कार 2019 मध्ये लॉन्च होईल.कंपनीने ONLINE  बुकिंगसाठी लिंक देखील शेअर केली आहे.ग्राहक कंपनीच्या अधिकृत डीलरकडे जावून देखील बुकिंग करू शकतात.  

 

पाच ते सात प्रवाशी बसतील अशी असेल  व्यवस्था 
ही,  5 ते 7 सिटांची SUV  कार टाटा मोटर्सची सर्वात स्टायलिश आणि हायटेक SUV कार असेल. याविषयी कंपनीच्या  सेल्स आणि नेटवर्क विभागाचे उपाध्यक्ष एस. एन. बर्मन यांनी सांगितले की, कंपनीने हॅरीयरसाठी बुकिंग सुरू केली आहे. ही कार जानेवारी 2019 मध्ये लॉन्च केली जावू शकते. लॉन्चिंग बरोबरच  त्याचे वितरण देखील सुरू केले जाईल. बुकिंगसाठी ग्राहकांना  30 हजार रुपये खर्च करावे लागतील.

 

कार बुकिंग साठी या लिंक वर क्लिक करा

 

कसे असेल टाटा हॅरियरचे इंजिन
>  या SUV मध्ये Kryotec 2.0 लीटर इंजिन असेल, जे BSVI मानकांचे अनुसरण करेल.
>  या मध्ये टाटा नवीन 4-सिलेंडर डीझल देत आहे.
>  5-सीटर मॉडेलसाठी 140bhp इंजिन असेल आणि 7-सीटर मॉडेलसाठी170bhp इंजिन असेल
> हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह येईल.

 

कसे असेल टाटा हॅरियरचे इंटेरिअर
>  माध्यमांच्या अहवालांप्रमाणे, डॅशबोर्डला एक स्पीडोमीटर आणि माहिती व मनोरंजनासाठी एक लांब डिस्प्ले स्क्रीन मिळेल.
> स्टेरिंग वर कॉन्ट्रोल साठी पुश बटन असेल ते ऑटो आणि मॅन्युअल गेअर बॉक्स सोबतच येऊ शकते. 
> गाडी सुरु आणि बंद करण्यासाठी पुश बटन असेल. 
> समोरचा प्रवासी कारच्या समोरच्या सीटला दुमडून पाय त्यावर ठेऊन आरामात बसू शकेल.  
> कंपनीने गाडीच्या किमती विषयी अद्याप कोणतीही माहिती आणखी प्रसिद्ध केली नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...