Home | National | Other State | Tata Steel Subsidiary Manager Shot Dead In Faridabad By Ex-Employee: Cops

टाटा स्टीलच्या Sr. Manager चा खून, माजी कर्मचाऱ्याने कॅबिनमध्ये घुसून झाडल्या 5 गोळ्या, नोकरीवरून काढल्याचा होता राग

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 11:36 AM IST

ऑगस्टमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक अरिंदमने त्याला नोकरीवरून काढले होते.

  • Tata Steel Subsidiary Manager Shot Dead In Faridabad By Ex-Employee: Cops

    फरीदाबाद - येथील टाटा स्टील प्रोसेसिंग अॅन्ड डिस्ट्रिब्युशन प्लांटच्या वेअरहाऊसमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा खून करण्यात आला. सीनिअर मॅनेजर (पुरवठा) पदावर कार्यरत असलेल्या अरिंदम पालचा खून त्यांच्याच एका माजी कर्मचाऱ्याने केला. आरोपी कर्मचाऱ्याने व्यवस्थापकाच्या कॅबिनमध्ये बहाण्याने घुसून त्याच्यावर 5 गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून कर्मचाऱ्यांनी कॅबिन गाठले तेव्हा अरिंदम अतिशय गंभीर अवस्थेत पडला होता. वेळीच पोलिसांना फोन लावून त्याला रुग्णालयात रवाना करण्यात आले. परंतु, रुग्णालय गाठण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

    नोकरीवरून काढल्याचा होता राग

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाटा चौक परिसरात असलेल्या टाटा वेअरहाऊसमध्ये विश्वनाथ पांडे (32) कार्यरत होता. परंतु, ऑगस्टमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक अरिंदमने त्याला नोकरीवरून काढले होते. विश्वानाथ पांडे शुक्रवारी दुपारी आपला उर्वरीत पगार, पीएफ आणि सेटलमेंट करण्याच्या बहाण्याने कंपनीच्या आवारात आला. त्याने थेट अरिंदमचे कॅबिन गाठले. यानंतर अगदी जवळून अरिंदमवर 5 गोळ्या झाडल्या आणि मागच्या दाराने निघून गेला. इतर कर्मचाऱ्यांना गोळीबाराचा आवाज आल्यानंतर त्यांनी कॅबिन गाठले. तेव्हा रक्तरंजित अवस्थेत जमीनीवर पडलेला अरिंदम दिसून आला. त्यांनी वेळीच पोलिसांना फोन लावून अरिंदमला रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. परंतु, रुग्णालय गाठण्यापूर्वीच व्यवस्थापकाचा मृत्यू झाला. कंपनीने अरिंदमच्या मृत्यूवर सांत्वना व्यक्त करताना कुटुंबियांना मदत करणार असे आश्वस्त केले. तर पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

Trending