Home | Business | Auto | tata, uk, business, auto

टाटांनी 'साहेबांना' बोलावले सुट्टीच्या दिवशीही कामाला

agency | Update - May 31, 2011, 12:59 PM IST

टाटांनी इंग्लडमधील जग्वार लॅंड रोव्हर कंपनी आपल्या ग्रुपमध्ये सामील करुन घेतल्यानंतर कंपनीने प्रथमच १.३ अब्ज पौंडाचा नफा जाहीर केला.

  • tata, uk, business, auto

    tata_225लंडन- टाटांनी इंग्लडमधील जग्वार लॅंड रोव्हर कंपनी आपल्या ग्रुपमध्ये सामील करुन घेतल्यानंतर कंपनीने प्रथमच १.३ अब्ज पौंडाचा नफा जाहीर केला. त्याबाबतची माहिती घेण्यासाठी टाटांनी कंपनीतील मोठ्या अधिकाऱयांना सुट्टीच्यादिवशीही कंपनीत बोलावले. कंपनीचा नफा वाढल्याने कंपनीत आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे अधिकाऱयांनी ना-नू केले नाही. पण टाटाच्या या निर्णयाने जगभर राज्य गाजवलेल्या देशातील 'साहेबांची' सुट्टी मात्र वाया गेली.या बैठकीनंतर मात्र कर्मचाऱयांत वेगळीच चर्चा सुरु झाली असल्याची बातमी तेथील स्थानिक वर्तमानपत्र बर्मिघम पोस्टने दिली आहे. त्यात म्हटले आहे की, सुट्टीच्या दिवशी बिझनेस मॅनेजरची मिंटिग घेणे हे थोडेसे वेगळे वाटते. इंग्लडमध्ये सुट्टीच्या दिवशी लोक घरीच राहून पुस्तके वाचणे व कुटुंबासमवेत वेळ घालवणे पसंत करतात. ही परंपरा १८७१ पासून चालत आली आहे. मात्र मागील काही दिवसापासून विशेषत मंदीनंतर कंपन्यांनी याबाबत वेगळा विचार सुरु केला आहे.

    टाटांनी इंग्लडमधील आपल्या वेगवेगळ्या कंपनीतील सुमारे १५०० कर्मचारी काढून टाकले होते. त्यानंतर रतन टाटांनी मागील आठवड्यात इंग्लडमधील कर्मचारी अळशी असून, त्याच्याबरोबर काम करणे अवघड असल्याचे म्हटले होते. त्यानंतर बरेच वादळ उटले होते. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे इंग्लडमधील अधिकारी वेगळ्या नजरेने पाहत आहेत.Trending