आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा एका वर्षांत 650 चार्जिंग स्टेशन स्थापणार, सर्व चार्जिंग स्टेशनमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांप्रमाणे आता भारतातही इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जात आहे. हा ट्रेंड लक्षात घेता टाटा ग्रुप देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक इकोसिस्टिम तयार करण्यात गुंतला आहे. रॉयटर्सनुसार, ग्रुपच्या चार कंपन्या टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स, टाटा पॉवर आणि टाटा क्रोम या दिशेने एकत्र प्रयत्न करत आहत. टाटाने मंगळवारी स्पोर्ट््स युटिलिटी वाहन नेक्सनचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करतेवेळी याची घोषणा केली. टाटा आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसोबत त्यासाठी आवश्यक बॅटरीचे उत्पादनही स्वत: करण्याची योजना आखत आहे. त्यासाठी कंपनी देशभरात आपले चार्जिंग नेटवर्कही स्थापित करणार आहे. 

सर्व चार्जिंग स्टेशनमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा 
टाटा पॉवर आता वेगवेगळ्या शहरांत सुमारे १०० चार्जिंग स्टेशन स्थापित करेल. येत्या एक वर्षात ६५० आणि चार्जिंग स्टेशन सुरू केले जातील. हे सर्व स्टेशन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतील. यासोबत हे मोबाइल अॅपच्या माध्यमातून कार मालकांशी जोडले जातील. या अॅपला ग्रुपने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(टीसीएस)च्या मदतीने तयार केले आहे.

बातम्या आणखी आहेत...