Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Taurus people nature and astrology

प्रेमसंबंध झटपट बनवण्यात सक्षम असतात या राशीचे स्त्री-पुरुष

दिव्यमराठी वेब टीम | Update - Oct 23, 2018, 05:44 PM IST

जाणून घ्या, या राशीच्या स्त्री-पुरुषाविषयी इतर रोचक गोष्टी..

 • Taurus people nature and astrology

  वृषभ राशीच्या लोकांचे जन्मनाव या अक्षरांपासून सुरु होते ई, उ, ए, ओ, वा, वि, वू, वे या. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचे लोक उत्तम श्रेणीतील प्रेमी असतात. वृषभ राशीचे लोक मग तो पुरुष असो किंवा स्त्री, दोघेही प्रेम संबंध बनवण्यामध्ये माहीर असतात. हे लोक फार लवकर प्रेम संबंध बनवण्यात सक्षम असतात. या राशीचे लोक प्रेम प्रकरणामध्ये खूप भावूक असतात. आपल्या जोडीदाराच्या प्रती हे दोघेही खूप प्रामाणिक असतात.

  जाणून घ्या, या राशीच्या स्त्री-पुरुषाविषयी इतर रोचक गोष्टी..

  वृषभ राशीचे लोक आपल्या प्रेम संबंधाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची अनिश्चितता पसंत करत नाहीत. या राशीच्या लोकांचे संबंध खूप मजबूत आणि आयुष्यभर नातं टिकवणारे असतात. हे लोक घटस्फोटाचे कट्टर विरोधी असतात . यांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखदायक असते. यांचा जोडीदारही यांच्यासोबत खूप सुखी आणि आनंदी राहतो. वृषभ राशीचे लोक दृढ निश्चयी असतात. आपल्या जोडीदाराला प्रत्येक सुख-दुखाच्या क्षणामध्ये मदत करतात आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात. या राशीचे लोक एकदम मनमिळावू आणि हसतमुख असतात.


  - वृषभ राशीचे चिन्ह बैल आहे. बैल स्वभावानेच खूप परिश्रमी(कष्टाळू) असतो. बैल स्वभावाने शांत असतो परंतु राग आल्यानंतर उग्र रूप धारण करतो. हाच स्वभाव वृषभ राशीच्या लोकांमध्ये दिसून येतो. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. याच्या अंतर्गत कृत्तिका नक्षत्राचे तीन चरण, रोहिणी नक्षत्राचे चार चरण आणि मृग नक्षत्राचे पहिले दोन चरण येतात.

  - या राशीच्या लोकांच्या जीवनात वडील-मुलामध्ये कलहाचे वातावरण राहते. या राशीच्या लोकांचे मन सरकारी काम करण्याकडे जास्त आकर्षित असते. सरकारी गुत्तेदारी करण्याची विशेष योग्यता यांच्यामध्ये असते. या राशीचे लोक जमिनीसंदर्भात काम करण्यास फार उत्सुक असतात.

  - गुरु ग्रहामुळे या राशीच्या लोकांना आपल्या ज्ञानावर खूप विश्वास असतो. या राशीचे लोक कोणतेही वक्तव्य हे गर्वाने करणारे असतात. जर वृषभ राशीच्या लोकांना केतू ग्रहाचे बळ मिळाले तर ते सरकारी क्षेत्रात मुख्य अधिकारी पद प्राप्त करू शकतात.

  - मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे वृषभ राशीचे लोक रागीट स्वभावाचे बनतात. कारखाने, स्वास्थ्य संबधित कार्य आणि जनतेचे वाद सोडवण्याचे काम हे लोक सहजरीत्या करू शकतात. या राशीच्या लोकांचे जीवन चढ-उतारांचे राहते. कुंडलीत मंगळ-सूर्याची युती असेल तर हे लोक शरीराने सडपातळ असतात. या राशीचे काही लोक रागीट आणि गर्विष्ठ स्वभावाचेही असतात. याची इतरांवर हुकूम सोडण्याची प्रवृत्ती असते.

  - या राशीचे लोक सौंदर्य आणि कलाप्रेमी असतात. कला क्षेत्रामध्ये यांना मान-सन्मान मिळतो. या राशीच्या स्त्रियांना आई आणि पतीची संपूर्ण मदत मिळते. कुटुंबामध्ये सुख-समृद्धी राहते. हे लोक आपल्या जोडीदाराच्या आधीन राहणे पसंत करतात.

  - वृषभ राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्र-बुध ग्रहाचा विशेष प्रभाव राहतो. हे दोन ग्रह इतर ग्रहांपेक्षा जास्त प्रभावशाली असल्यास या राशीच्या लोकांना आपत्य स्वरूपात मुली जास्त प्राप्त होतात. या राशीचे लोक स्वतः बनवलेल्या नियमानुसार जीवन जगणे पसंत करतात. हे लोक अनेकदा स्वतःच्याच जाळ्यात अडकतील अशी परिस्थिती निर्माण करून घेतात.

Trending