आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नगर- कर्जत येथील दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणाऱ्या तौसिफ शेख याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी अहमदनगर संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मन्सूर शेख, उबेद शेख, अंजर खान, अजीम शेख, आजीम राजे, हनिफ जरीवाला, अत्तार शेख, अफसर शेख, साहेबान जहागीरदार, सर्फराज जहागीरदार, नईम सरदार, अमीर सय्यद, अल्तमश जरीवाला, रियाज सय्यद, रेखा जरे, आबिद हुसेन, शानू सय्यद, अफजल सय्यद, रफिक मुंशी, अनिस शेख, हनिफ शेख, अल्ताफ शेख आदींसह मुस्लिम समाज बांधव व विविध स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
कर्जत येथील दावल मलिक ट्रस्ट या वक्फ बोर्डच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी तौसिफने अनेकदा उपोषण केली. वक्फ बोर्डाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी याबाबत कानडोळा केला. हा प्रश्न सुटत नसल्याने तौसिफने आत्मदहनाचा इशारा दिला. न्याय न मिळाल्याने त्याने आत्मदहन करुन जीवनयात्रा संपवली. त्याच्या मृत्यूस वक्फ बोर्डाचे व जिल्हा प्रशासनाचे संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तौसिफला न्याय मिळण्यासाठी दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील पक्की अतिक्रमणे हटवण्यात यावी, बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, तौसिफच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी व ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी, तसेच राज्यातील वक्फ बोर्डवरील अतिक्रमणांचा आढावा घेऊन अतिक्रमण हटवावे, वक्फ जमिनीवरील उत्पन्नाचा पैसा अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण व युवकांच्या रोजगारासाठी खर्च करावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.