आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहकर्जावर मिळू शकते ३.५ लाख रुपयांपर्यंत कर सवलत; कलम २४ अंतर्गत हाेती २ लाख रुपये वजावट सुविधा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्ज घेऊन घर तयार करणे वा खरेदी करणे आधीच्या तुलनेत जास्त साेपे झाले आहे. पहिल्यांदा गृहकर्जावर दाेन लाख रुपयांच्या वजावटीची सुविधा हाेती. आता ती एकूण ३.५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्प २०१९मध्ये प्राप्तिकर कायद्यात मूल्यधारण वर्ष २०२०-२१ साठी (विद्यमान आर्थिक वर्ष) कलम ८० ईईए हे नवीन कलम जाेडण्यात आले आहे. त्यानुसार गृहकर्जावरील व्याजावर १.५ लाख रुपयांची अतिरिक्त कर वजावट सुविधा दिली आहे. म्हणजे ही कलम २४ च्या अंतर्गत गृहकर्जावर आधीपासून मिळणाऱ्या दाेन लाख रुपयांच्या वजावटीच्या व्यतिरिक्त आहे. याचा अर्थ जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी  एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलेले असल्यास ते कर्ज फेडण्यासाठी व्याजावर एकूण ३.५ लाख रुपयांच्या वजावटीची सुविधा मिळेल. टॅक्स4वेल्थचे फायनान्शियल काेच अमित यांच्या  म्हणण्यानुसार  सर्वांसाठी घरे ही सरकारची माेहीम आहे. त्याअंतर्गत सरकारने सर्वांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या माेहीमेमध्ये  ही स्वस्त घराची सुविधा दिली आहे.
 

गृहकर्जावर मिळणाऱ्या वजावटीमुळे करदात्याची किती हाेऊ शकेल बचत
> ५ % कर स्तरात येणाऱ्या करदात्यांना कलम ८०इइए अंतर्गत एकूण ७,८०० रुपयांची बचत हाेईल. जर यात कलम २४ अंतर्गत मिळणाऱ्या वजावटीच्या फायद्यांचा समावेश केला तर करदात्यांची एकूण १७,२०० रुपयांची बचत हाेईल.
> २० % कर स्तरात येणाऱ्या करदात्यांचे कलम ८० ईईए अंतर्गत एकूण ३१,२०० रुपये वाचतील. जर यात कलम २४ अंतर्गत मिळणाऱ्या वजावटीच्या फायद्यांचा समावेश केला तर करदात्यांचे एकूण ७२,८०० रुपये वाचतील.

> ३० % कर स्तरात येणाऱ्या करदात्यांना कलम ८०इइए अंतर्गत एकूण ४६,८०० रुपयांची बचत हाेईल. जर यात कलम २४ अंतर्गत मिळणाऱ्या वजावटीच्या फायद्यांचा समावेश केला तर करदात्यांची एकूण १,०९,२०० रुपयांची बचत हाेईल.
 

या वजावटीचा फायदा घेण्यासाठी सहा अटींचे करावे लागेल पालन 
> गृहकर्ज हे एखादी वित्तीय संस्था वा गृह वित्त कंपनीकडूनच घेतलेले असावे. अन्य प्रकारच्या कर्जावर वजावट सुविधा मिळणार नाही
> १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत घेतलेल्या कर्जावरच ही सुविधा मिळेल
> स्वत:ला राहण्यासाठी खरेदी केलेल्या घराच्या कर्जावरच मिळेल वजावट. हे घर तुम्ही भाड्याने देऊ शकत नाही.
> हाउसिंग प्राॅपर्टीचे स्टंॅप मूल्य ४५ लाख रुपये वा त्यापेक्षा कमी असावे. कारण सरकार सर्वांना घरे उपलब्ध करून देण्याची माेहीम राबवत आहे. ही सुविधा महाग घरांसाठी नाही.
> कर्ज मंजूर हाेण्याच्या दिवशी करदात्याच्या नावावर काेणतेही राहते (रेसिडेन्शियल) घर नकाे. म्हणजे हे तुमचे पहिले राहते घर असले पाहिजे.
> ही वजावट केवळ व्यक्तिगत करदात्यांनाच मिळते. कंपनी, विश्वस्त किंवा अन्य काेणाला ही वजावट मिळत नाही.

बातम्या आणखी आहेत...