आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षा पास केली, अधिकारी बनल्या, परंतु पती अन् सासूच्या छळामुळे एवढ्या खचल्या की आत्महत्या केली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - IRS बिन्नी शर्मा यांच्या सुसाइडमुळे बजाजनगर एन्क्लेव्ह कॉलनी आणि त्यांच्या विभागातील प्रत्येक जण स्तब्ध झाला आहे. घर क्रमांक व्ही-7 मध्ये बिन्नी शर्मा यांच्या कुटुंबीयांना सांत्वन द्यायला आलेल्या गर्दीत त्यांचा मुलगा चाहत (वय 8) हासुद्धा उभा होता. त्याला हे माहिती नव्हते की, त्याची आई आता या जगात नाही. बिन्नी यांचा मोठा मुलगा चाहत वालिया याचे हाल पाहवले जात नव्हते. बिन्नी (वय 35) यांनी कौटुंबिक कलहामुळे त्रस्त होऊन सोमवारी रात्री उशिरा गळफास लावून आत्महत्या केली होती.


घरात जेही परिचित यायचे, त्यांच्या गळ्यात पडून रडायचा...

- माझी मम्मी रूममध्ये आराम करतेय, मला तिला भेटायचंय. कुणीतरी मला त्यांची भेट घेऊ द्या. मला माझ्या मम्मीकडे घेऊन चला. जेव्हा बिन्नीचा मृतदेह घरी पोहोचला तेव्हा चाहतला घेऊन त्याचे कुटुंबीय बाहेर गेले. कुटुंबीय चाहतची समजूत घालत होते की, मम्मी आजारी आहे, डॉक्टर त्यांना पाहायला आले आहेत. घरातून बिन्नी यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा चाहत धावतच पार्थिवाकडे पोहोचला. तो ओरडू लागला- माझ्या मम्मीला नेऊ नका, मीपण सोबत येतो.
- बिन्नी यांच्या दीड वर्षांच्या मुकुंदला तर अजून जीवन-मृत्यूचा अर्थही कळत नाही. आईच्या पार्थिवाकडे पाहून मुकुंद फक्त किंचाळत होता. रडणाऱ्या मुक़ुंदला कधी आजी, तर कधी मावशी जवळ घेऊन शांत करायची.

- बिन्नी यांचे पती गुरुप्रीत वालिया IAS ऑफिसर आहेत. चंदिगडमध्ये ऑडिट विभागात कार्यरत आहेत. त्यांचे 9 वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

- बिन्नी जयपुरात जीएसटीमध्ये डेप्युटी कमिश्नर पदावर कार्यरत होत्या. त्या मागच्या काही महिन्यांपासून तणावात होत्या. त्या सासू मधू शर्मा, 8 वर्षांचा मोठा मुलगा चाहत आणि दीड वर्षांचा मुलगा मुकुंदसोबत जयपुरात राहत होत्या.


पोलिसांना आढळली 4 ओळींची सुसाइड नोट
- मृत बिन्नी यांच्या बेडरूममधून पोलिसांना 4 ओळींची इंग्रजीत लिहिलेली एक सुसाइड नोटही आढळली आहे. बिन्नी यांनी फाशी घेण्यापूर्वी लिहिले होते- "मी खोटेपणामुळे खूप परेशान झाले आहे. पती आणि सासूने माझे आयुष्य बरबाद केले आहे. देवच माझ्या मुलांची काळजी घेईल, मी जात आहे."

- पोलिस सुसाइड नोट हस्तगत केल्यानंतर प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिस स्टेशन प्रभारी रायसर सिंह म्हणाले की, आतापर्यंत मृताच्या कुटुंबीयांकडून पोलिसांना कोणतीही तक्रार मिळालेली नाही.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos व Video...

 

बातम्या आणखी आहेत...