आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकीदारांच्या घरासमाेर बँड वाजवून वसूल केला जाताेय कर; पहिल्या दिवशी १९ लाखांची करवसुली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - सामान्यपणे बँड हा एखादे लग्न, पार्टी आदी मंगलकार्यांतच वाजवला जाताे; परंतु उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील एका हाॅटेलबाहेरील एका बँड पथकाने मंगळवारी लाेकांचे लक्ष आकर्षित करून घेतले. एखाद्या शुभकार्यामुळे नव्हे, तर संबंधित हाॅटेलचालकाकडील थकीत कर वसूल करण्यासाठी तेथे बँड वाजवला जात हाेता. कारण ल‌खनऊ पालिकेने माेठ्या थकबाकीदारांकडील कर वसूल करण्यासाठी हा अनाेखा फंडा शाेधून काढला आहे. पालिका अधिकाऱ्यांनी थ्री-स्टार हाॅटेल इंडियाबाहेर बँड व ढोल पथकासाेबत जाऊन बँड वाजवला व तेथेच १९ लाखांचा कर वसूल केला. संबंधित मालकाकडे ३१.१२ लाखांचा कर घेणे आहे. याबाबत त्याला अनेकदा नोटीस बजावल्या; परंतु त्याने दुर्लक्ष केल्यामुळे हा फंडा वापरला. यासाठी पालिकेने एका बँडवाल्याशी करार केला आहे, असे आयुक्त इंद्रमणी त्रिपाठी यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...