आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Taylor Is The World's Highest Grossing Singer, Earning More That 3 Crore In A Day

टेलर जगातील सर्वाधिक पैसे कमावणारी गायिका, एका दिवसाची कमाई ३.६२ कोटी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - फोर्ब्ज मासिकाने गायनात सर्वाधिक कमाई करणाऱ्या गायकांची यादी जाहीर केली आहे. यात अमेरिकी पॉप सिंगर टेलर स्विफ्ट अव्वल स्थानी आहे. फोर्ब्जनुसार, ‘हायेस्ट पेड सेलिब्रिटी’ टेलरची वार्षिक कमाई १८५ मिलियन डॉलर (सुमारे १३२२ कोटी रुपये) इतकी आहे. तिचे एक दिवसाचे उत्पन्न ५.६ लाख डॉलर (सुमारे ३.६२ कोटी रुपये) इतके आहे. याच यादीत बियान्से दुसऱ्या व रिहाना तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे फोर्ब्जने जुलै महिन्यात ग्लोबल सेलेब्जची यादी जाहीर केली होती. त्यातही स्विफ्ट पहिल्या क्रमांकावर होती. या यादीत फक्त दोन महिलांना स्थान मिळाले होते. यात टेलर स्विफ्टनंतर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकी रिअल स्टार व मॉडेल काइली जेनरचे नाव होते. वृत्तानुसार, स्विफ्टकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता आहेत. तिच्या चार वेगवेगळ्या राज्यांत ८ पेक्षा जास्त मालमत्ताही आहेत. टेलरने आपल्या कमाईतील सर्वाधिक भाग रिअल इस्टेटमध्ये गुंतवला आहे. 

बातम्या आणखी आहेत...