आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरू - इन्फाेसिस आणि टीसीएस या आयटी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या देशातील दाेन माेठ्या कंपन्यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच एकाच दिवशी आर्थिक निकाल जाहीर केले. टीसीएसच्या महसुलात तिमाही अणि वार्षिक आधारावर जवळपास १८ टक्के वाढ झाली आे. नफा मार्च अखेर संपलेल्या तिमाहीत १७.७ % आणि पूर्ण वर्षभरात २१.८ % वाढला आहे. इन्फाेसिसच्या तिमाही महसुलात १९ % आणि वार्षिक १७.२ % वाढ झाली आहे. कंपनीचा तिमाही नफा १०.५ टक्क्यांनी वाढलेला असला तरी वार्षिक नफा जवळपास ४ टक्क्यांनी घटला आहे. इन्फाेसिसच्या खर्चात २०.६ टक्क्यांनी तर टीसीएसचा १७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च अखेर संपलेल्या तिमाहीमध्ये महसुलात १५ टक्क्यांनी वाढ झाली. तिमाही कालावधीतील ही वाढ सर्वात जास्त आहे. आॅर्डर बुकमध्ये तिमाहीत जास्त वाढ झाली असल्याचे टीसीएसचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईआे राजेश गाेपीनाथन यांनी सांगितले. जगातील ४५ देशांमध्ये व्यवसाय असलेल्या इन्फाेसिसचा महसूल डाॅलर मूल्यात २०१९-२० मध्ये ७.५ %-९.५ % वाढण्याची अपेक्षा आहे. २०१८-१९ मध्ये महसुलात ७.९ % वाढ झाली हाेती. टीसीएसच्या पूर्ण वर्षभरातील महसुलापैकी २८. ६% महसूल डिजिटल विभागातून मिळाला.
तुलना: टीसीएसमध्ये कंपनी साेडण्याचे प्रमाण ११.३ , तर इन्फाेसिसमध्ये २०.४% , दोन्ही कंपन्यांच्या महसूलात वाढ
टीसीएस: 31,472 कोटी रूपयांचा नफा
महसूल :
> तिमाही १८.५ %, वार्षिक १८.९ % वाढ
> तिमाही महसूल ३२,०७५ काेटी रुपयांनी वाढून ३८,०१० काेटींवर
> वार्षिक महसूल १.२३ लाख काेटी रुपयांवरून १.४६ लाख काेटी रुपयांवर
नफा :
> तिमाही १७.७ % आणि वार्षिक २१.८ % वाढ
> तिमाही नफा ६,९०४ काेटी रुपयांवरून वाढून ८,१२६ काेटी रुपयांवर
> वार्षिक नफा २५,८२६ काेटी रुपयांच्या तुलनेत ३१,४७२ काेटी रु. झाला.
इन्फोसिस: 15,410 कोटी रूपयांचा नफा
महसूल :
> तिमाही १९.१ % व वार्षिक १७.२% वाढ
> तिमाही महसूल १८,०८३ काेटी रुपयांनी वाढून २१,५३९ काेटींवर
> वार्षिक महसूल ७०,५२२ काेटी रुपयांनी वाढून ८२,६७५ काेटी रु. वर
नफा :
> तिमाही १०.५ % वाढ, वार्षिक ३.८ % ताेटा
> तिमाही नफा ३,६९० काेटी रुपयांनी वाढून ४,०७८ काेटी रुपयांवर
> वार्षिक नफा १६,०२९ काेटी रुपयांनी घटून १५,४१० काेटी रुपयांवर आला
लाभांश : टीसीएस १८ रु, इन्फाेसिस १०.५० रुपये देणार
> टीसीएसने प्रति समभाग १८ रुपये लाभांश देण्याची घाेषणा केली.पूर्ण वर्षात लाभांश ३० रुपये हाेईल.
> इन्फाेसिस भागधारकांना प्रति समभाग १०.५० रु. लाभांश देईल. पूर्ण वर्षात १७.५० रु.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.