आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणासाठी लातूरात शिक्षकाची आत्‍महत्‍या, मुलांना नोकरी लागत नसल्‍यामुळे नैराश्‍य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूर तालुक्यातील माटेफळ येथील एका शिक्षकाने बुधवारी कर्जाचा डोंगर आणि मराठा आरक्षण मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  माटेफळ येथील रमेश ज्ञानोबा पाटील (५०) हे निवळी (ता. लातूर) येथील  खासगी शाळेत शिक्षक होते. त्यांनी बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. 


नातेवाइकांनी सांगितले की, त्यांच्याकडे एक चिठ्ठी आढळली असून त्यामध्ये  माझी मुलगी एमएस्सीला विद्यापीठातून दुसरी व लातूर जिल्ह्यातून पहिली आली आहे. पण आरक्षण नसल्यामुळे माझ्या तिन्ही मुलांना नोकरी नाही. माझ्या एकट्याच्या पगारावर संसाराचा गाडा चालत नसल्यामुळे व माझ्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्यामुळे मी निराश होऊन आत्महत्या करीत आहे. माझ्या पश्चात शासनाने माझ्या पत्नीला लवकरात लवकर पेन्शन चालू करावी,  असे लिहिले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...