आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
रिलिजन डेस्क - एका मुलाने आपल्या गुरुला सांगितले की, मला यशस्वी व्हायचे आहे. गुरुजी मला यशस्वी होण्याचा मार्ग सांगा. यावर गुरु मुलाला म्हणाले, मी तुला यशस्वी होण्याचा मार्ग सांगतो पण त्यापूर्वी तू माझी बकरी खुंटीला बांध, एवढे म्हणत गुरुने बकरीची दोरी मुलाच्या हातात दिली.
> ती बकरी आपल्या मालकाव्यतिरिक्त कोणाच्याही नियंत्रणात येत नव्हती. मुलाने दोरी पकडताच बकरीने उड्या मारण्यास सुरुवात केली. बरेच प्रयत्न करून सुद्धा मुलगा त्या बकरीला खुंट्याला बांधू शकला नाही.
> अखेर मुलाने चातुर्याने बकरीला पकडून दोरीने तिचे पाय बांधले. यानंतर त्याने सहजरित्या बकरीला खुंटीला बांधले.
> मुलाचे चातुर्य पाहुन गुरुजी प्रसन्न झाले. ते मुलाला म्हणाले तू आपल्या बुद्धीचा चांगला उपयोग केला. आपण जर अशाचप्रकारे कोणत्याही अडचणीच्या मूळापर्यंत पोहचलो तर ती अडचण सहजरित्या दूर करू शकतो आणि आपल्याला यश मिळते. हाच यशस्वी होण्याचा मूळमंत्र आहे.
कथेची शिकवण
या कथेपासून आपल्याला शिकवण मिळते की, आपण अडचणींमध्ये सावधगिरीने काम केले पाहिजे. अडचणींचे मूळ कारण शोधून त्यावर उपाय शोधावा. अशाप्रकारे मोठ-मोठ्या अडचणी सहज दूर करता येतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.