आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाची विद्यार्थिनीला मारहाण; समजूत काढल्यावर वादावर पडदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या विरुद्ध इतर विद्यार्थिनींनी आरोप केले. त्यामुळे शिक्षकाने विद्यार्थिनीच्या डोक्यावर चापट मारली. यामुळे त्या विद्यार्थिनीसह पालक जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आले होते. दरम्यान, इतर विद्यार्थिनीच आपणास त्रास देत असून उलट शिक्षकांनी देखील मारहाण केल्यामुळे विद्यार्थिनी व पालक संतापले होते. पोलिसांनी मध्यस्ती करून पालक, विद्यार्थिनी व शिक्षकांची समजूत काढल्यानंतर हा वाद मिटवण्यात आला. 


विद्यार्थिनीची तक्रार इतरांनी केली. त्यामुळे शिक्षक या नात्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्यामुळे विद्यार्थिनीने माझ्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी पालकांना बोलावून पोलिस ठाण्यात आले, असे शिक्षकांचे म्हणने आहे. तर इतर विद्यार्थिनी मला त्रास देतात, माझ्या विरुद्ध खोटे आरोप करतात तरी देखील शिक्षकांनी मलाच मारले असा आरोप विद्यार्थिनीने केला होता. बुधवारी दुपारी दोन तास हे प्रकरण जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सुरू होते. अखेर पोलिसांनी दोन्ही बाजू समजून घेतल्या. दोघांची समजूत काढल्यानंतर या प्रकरणात तक्रार झाली नाही. 

बातम्या आणखी आहेत...