आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेतील मुलांच्या भांडणामुळे शिक्षकाचा राग झाला अनावर, 6 वर्षीय चिमुकलीला केली बेदम मारहाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नौज  : उत्तर प्रदेशच्या जदगीशपूर मालपुरा गावातील प्राथमिक शाळेत एक हृदय पिटाळून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका शिक्षकाने रागाच्या भरात एका विद्यार्थ्याला मरेपर्यंत बेदम मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत काही मुले भांडण करत होते. मुलांच्या या भांडणामुळे शिक्षकाचा राग झाला आणि त्याने इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या 6 वर्षीय मुलीला निर्दयीपणे बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे जखमी झालेल्या मुलीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

 

मुलीच्या मृत्यूनंतर शिक्षक फरार

- पीडित मुलगी रूग्णालयात मृत्यूशी लढत होती. पण अखेर तिचा मृत्यू झाला. मुलीचा मृ्त्यू होताच इतर मुलांनी शाळा गाठली. पण शिक्षक शाळा बंद करून फरार झाला होता. सदरील घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. पोलिस सदर घटनेचा तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...