आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भागलपुर(बिहार)- नववधु नेहा कुमारी (23) हिचा मृतदेह रात्री पोलिसांनी तिच्या घरातून नेला. नेहाच्या गळ्यापर निशाण होते, कुटुंबीयांनी सांगितले की ओढनीने गळफास घेऊन तिने आत्महत्त्या केली आहे. पोलिसांच्या पोहचण्याआधीच घरच्यांनी मृतदेहाला खाली उतरवले आणि नंतर पोलिसांना घटनेची माहिती देली. घटनास्थळावरून पोलिसांना सुसाइड नोट मिळाली.
पोलिसांनी मृतदेहाला शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी सांगितले की, प्रकरण आत्महत्येचे दिसत आहे. घटनास्थळावरून एक सुसाइड नोट मिळाली आहे आणि त्यावरून पोलिस वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत.
पतीने सोडल्यामुळे डिप्रेशनमध्ये होती नेहा
नेहाचे वडील रतन कुमार यांनी सांगितले की, नेहाचे लग्न एप्रिल 2017 मध्ये कैलाश मंडलसोबत झाले होते. लग्नानंतर नेहाच्या घरचे तिला हूंड्यासाठी मारहाण करायचे, त्यानंतर लग्नाच्या 5 महिन्यानंतर नवऱ्याने तिला सोडून दिले. तेव्हापासून नेहा आपल्या माहेरी राहत होती. तिच्या वडिलांनी सांगितले की, नवऱ्याने सोडून दिल्यापासून ती खुप डिप्रेशनमध्ये राहत होती. ती नेहमी स्वत:ला सुंदर नसल्यामुळ दोषी समजायची.
घटनेच्यावेळेस वडील घरी नव्हते
नेहा 5 बहिण आणि 1 भावात सगळ्यात मोठी होती. ती गल्लीतील मुलांना ट्यूशन द्यायची, वडीलदेखील ट्यूशन द्यायचे. रतन कुमार यांनी सांगितले की, ते शुक्रवारी ट्यूशन देण्यासाठी गेले होते, तर पत्नी लता देवीपण शिलाई मशीन ठिक करण्यासाटी बाजारात गेल्या होत्या. घरात नेहाशिवाय मुलगी जूही (18), शालिनी (13), स्वाति आणि संध्या (5) होत्या, त्या सगळ्या गच्चीवर होत्या आणि नेहा घरात एकटी होती. जूही आणि शालिनीने नेहाला आवाज दिली तेव्हा तिने दार नाही उघडले. त्यानतंर त्यांनी दार तोडून पाहिले की, नेहाने गळफास घेतला आहे. त्यानंतर त्यांनी नेहाला खाली उतरवले आणि घटनेची माहिती वडिलांना दिली.
नेहाने सुसाइड नोटमध्ये लिहीले
"मी पूर्ण शुद्धीत आत्महत्या करत आहे कारण मला जगाचा आणि माझा कंटाळा आलाय. मला नाही माहिती की, लोक माझ्याकडून कोणत्या जन्माचा बदला घेत आहेत. मी खुप लोकांना त्रास दिला आहे. मी सगळ्यांची माफी मागते, मला माफ करा. मी सगळ्यांवर प्रेम केले पण त्याचे हे फळ मिळेल याचा विचार केला नव्हता. सगळे आनंदी राहा आणि माझ्या आत्माला शांति मिळो असे प्रार्थना करना. तुमचीच नेहा."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.