आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिजाब घालून मुलांना शिकवण्याऱ्या शिक्षिकेस प्रिन्सिपलने रोखले, दिली सक्त ताकीद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - लखनऊ येथील एका शाळेतील मुस्लिम शिक्षिकेकडून जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिला हिजाब न घालता शिकविण्याची सूचना दिली होती. परंतु जेव्हा शिक्षिकेने त्यांच्या सूचनेचे पालन करण्यास नकार दिला तेव्हा तिच्याकडून बळजबरीने राजीनामा लिहून घेतल्याचा आरोप या शिक्षिकेने केला आहे. हे प्रकरण 3 नोव्हेंबरचे आहे, परंतु शिक्षिका आता प्रसारमाध्यमांच्या समोर आली आहे.

 

शिक्षिकेने केले हे आरोप
> ठाकूरगंज पोलीस ठाणे परिसरात तहसीनंज चौकाजवळ एक एसएमएस शाळा आहे. या शाळेतील शिक्षिका फातिमा हसन यांनी आरोप केला आहे की, त्यांना हिजाब घालून वर्ग न घेण्याची सूचना दिली होती. असेही म्हटले होते की, जर तुम्हाला हिजाब घालायचा असेल तर तुम्हाला घरीच राहावे लागेल. कारण वर्गखोली किंवा शाळेच्या परिसरात हिजाब परिधान केल्यास येथे शिकणाऱ्या मुलांच्या पालकांची नजर पडते. यामुळे शाळेला नुकसान  होते. फातिमा हसन मागील एक वर्षापासून शाळेत मुलांना शिकवत होती.

 

प्रिंसिपलने केले आरोपांचे खंडन, सांगितले यामागचे खरे कारण
> याबाबत प्रिंसिपल मुजफ्फर काझीम यांचे म्हणणे आहे की, हिजाब घालण्याबाबत कोणताही विवाद किंवा आपत्ती नाही. हा वाद हिजाब घालण्यावरून नाही तर दोन वर्गाच्या मुलांना शारीरिक शिक्षा देण्याशी संबंधित आहे. शाळेत बोर्डिंग क्लास चालतात. म्हणूनच फातिमा हसन यांना मुलांवर शारीरिक शिक्षा देण्यापासून रोखले होते. पण त्यांनी काहीही न ऐकता राजीनामा सुपू्र्द केला. हिजाबबद्दल काहीच बोलणे झाले नसून फातिमा यांचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे प्रिंसिपल मुजफ्फर काझीम यांनी सांगितले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...