आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थिनींना पोर्न दाखवून चाळे; शिक्षकाला चोपले

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • नांदेड जिल्ह्यातील प्रकार; पॉक्सोअंतर्गत गुन्हा
  • पालकांना कळाल्याने तो शाळेमध्ये आलाच नाही

नांदेड - म्हाळज येथील प्रबोधन प्राथमिक शाळेतील स्वप्निल शृंगारे या शिक्षकाने तिसरी आणि चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना वरच्या मजल्यावर नेऊन त्यांना मोबाइलवर अश्लील क्लिप दाखवून त्यांच्याशी अश्लील चाळे केल्याचे प्रकरण उघडकीस आले. यानंतर संतप्त पालकांनी शाळेत जाऊन या शिक्षकाला चाेप देऊन पाेलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक स्वप्निल शृंगारे काही मुलींना शाळा सुरू असताना वरच्या मजल्यावर घेऊन जायचा. त्यांना मोबाइलमधील अश्लील चित्रफिती दाखवून मुलींशी अश्लील चाळे करायचा. हा प्रकार गेल्या ५-६ महिन्यांपासून सुरू होता. याबाबत वाच्यता केली तर शाळेतून काढून टाकेन, शाळेच्या गच्चीवरून फेकून देऊन जीव घेईन, अशा धमक्या त्याने  विद्यार्थिनींना दिल्या. शनिवारी एका विद्यार्थिनीची प्रकृती अचानक घरी गेल्यावर बिघडली. त्या वेळी तिच्या पालकांनी खोदून विचारपूस केल्यानंतर त्या मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.पालकांना कळाल्याने तो शाळेमध्ये आलाच नाही

सोमवारी शाळा उघडल्यानंतर पालक शाळेत जमा झाले. त्यांनी सर्व प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला. परंतु स्वप्निल शाळेत नव्हता. विद्यार्थिनींनी अापल्या कृत्याची माहिती पालकांना दिल्याचे त्याला कळाले हाेते. तो यामुळे सोमवारी शाळेत आलाच नाही. पालकांनी मुख्याध्यापकांना घेराव घालून त्याला शाळेत बोलावून घ्या असा आग्रह धरला. अखेर मुख्याध्यापकांनी त्याला शाळेत बोलावून घेतले.

 

बातम्या आणखी आहेत...