आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा, शिक्षकाकडून पाच खेळाडू विद्यार्थिनींवर अत्याचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गंगापूर रोडवरील एका शाळेतील क्रीडा शिक्षकाकडून पाच खेळाडू मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  शनिवारी (दि. २२)  मुलींच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला घेराव घालत संबंधित शिक्षकाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी रात्री उशिरा गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाचा शाळेने राजीनामा घेतल्याचे या वेळी सांगण्यात  आले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोडवरील एका शाळेतील असिस्टंट ट्रेनिंग ऑफिसरकडून पाच खेळाडू मुलींवर शारीरिक अत्याचार करत असल्याची तक्रार पालकांनी दिली आहे. शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना क्रीडा शिक्षकाकडून खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. या मुलींना प्रशिक्षण देताना संशयित शिक्षकाकडून मुलींना ‘बॅड टच’ केला जात असल्याने मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पाच मुलींमध्ये तीन मुली या बाहेरच्या राज्यातील रहिवासी आहेत, तर दोन नाशिक शहरातील आहे. यातील एका पीडित मुलीने पालकांना याबाबत माहिती दिली. पालकांनी याबाबत शाळा व्यवस्थपानाकडे तक्रार दिली. मात्र, शाळा व्यवस्थापनेकडून पालकांवर दबाव टाकत प्रकरण पुढे न वाढवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे संतप्त पालकांनी संशयित  करपे नामक क्रीडा शिक्षकाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. रात्री उशिरा गंगापूर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांनी पीडित मुलींकडून माहिती घेतली. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.