आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेल्मेट न घातल्याप्रकरणी पत्नीला दंड; पतीचा संताप; हायवेवरच झोपून शिक्षकाने केला ड्रामा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महामार्गावर हेल्मेट न घालणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केलेली आहे; परंतु नागरिक स्वत:च्या सुरक्षिततेला प्राधान्य न देता कारवाईपासून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पत्नीला हेल्मेट न घातल्याप्रकरणी दंड आकारत असल्याने व्यवसायाने शिक्षक असलेल्या पतीने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच महामार्गावर झोपून आरडाओरड करीत गोंधळ घातला.

 

शहर वाहतूक शाखेचे पुरुष व महिला कर्मचारी गुरुवारी महामार्गावर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करीत होते. काही दुचाकीस्वार दंडात्मक कारवाईपासून पळ काढण्यासाठी रस्त्याच्या कडेने किंवा दुचाकी वळवून परत जात होते. दुचाकीवर मुलाला घेऊन जात असलेल्या एका महिलेला सकाळी 11 वाजेच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ अडवले. त्या महिलेला हेल्मेट न घातल्याने 500 रुपये दंडाचा मेमो महिला कर्मचाऱ्यांनी दिला. त्या वेळी त्या महिलेने माझ्यावरच का कारवाई करताय, इतरांना सोडून देता, असे म्हणून महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

 

कर्मचाऱ्यांनी महामार्गावर आरडाओरड
नेहते (पूर्ण नाव माहीत नाही) आडनाव असलेल्या त्या महिलेच्या पतीनेही हेल्मेट न घातल्याप्रकरणी 500 रुपयांचा दंड आकारत असल्याने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. इतरांवर कारवाई करीत नसल्याचा आरोप नेहते यांनी पोलिसांवर केला. त्यानंतर आरडाओरड करीत थेट महामार्गावरच झोपून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी पत्नी व मुलगाही त्यांच्यासोबत होता. या वेळी ट्रक येऊन त्यांच्यासमोर थांबला. मोठ्या प्रमाणावर नागरिक घटनास्थळाच्या बाजूला जमा झाले. महामार्गावर गोंधळ घालत असल्याने कर्मचाऱ्यांनी पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांना कळवले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मनसुब अली व कर्मचाऱ्यांनी दांपत्याला ताब्यात घेऊन रामानंदनगर पोलिस ठाण्यात आणले.

बातम्या आणखी आहेत...