आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाने केला 6 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग, वर्ग खोलीत बोलावून करत होता अश्लील चाळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संग्रामपूर : तालुक्यातील पिंप्री अडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात शिकणाऱ्या एका सहा वर्षीय निरागस मुलीसोबत मागील १५ दिवसांपासून शिक्षक वर्ग खोलीतच अश्लील चाळे करत असल्याचे पीडित मुलीने आईवडिलांना सांगितले. त्यामुळे या नराधम शिक्षकाचे पितळ उघडे पडले आहे. ही घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी शिक्षक फरार झाला आहे. 


प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील पिंप्री अडगाव येथील एक सहा वर्षीय विद्यार्थिनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात शिक्षण घेत आहे. मागील पंधरा दिवसांपासून शाळेतीलच शिक्षक सुधाकर बुंदे हा त्या मुलीला वर्ग खोलीत बोलावून तिच्या सोबत अश्लील चाळे करत होता. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता. दरम्यान, आज सकाळी या घटनेची माहिती त्या चिमुकल्या मुलीने आपल्या आईवडिलांना दिली. माहिती मिळताच तिच्या पालकांनी तामगाव पोलिसांत धाव घेऊन शिक्षक बुंदे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांत तक्रार दाखल झाल्याचे समजताच शिक्षक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार डी. बी. इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पाटील करत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...