आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापापरी- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना 20 वर्षांनंतर परत एकदा कारगिल युद्ध अनुभवायला मिळाले आहे. पदद्यावर युद्ध पाहताना ते अनुभवताना विद्यार्थ्यांच्या अंगावर शहारे आले, तर युद्धात लढताना अंगावर गोळ्या झेलत धारातीर्थ पडत शहीद झालेले जवान पाहुन काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या.
कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने कारगिल युद्धातिल वीर जवान व शहीद जवान यांना मानवंदना देण्यासाठी तसेच प्रत्यक्षात सीमेवर आपले जवान रात्री अपरात्री उन, वारा पाऊस, ठंडी, यांचा सामना करत युद्ध कसे लढतात, हे विद्यार्थ्यांना लक्षात यावे व देशप्रेम त्यांच्या अंगी अधिक दृढ़व्हावे या हेतुने शिक्षकांनी मोठ्या डिजिटल स्क्रीनवर विद्यार्थ्यांना एल ओ सी कारगील हा चित्रपटाचा प्रयोग आयोजित केला होता. शाळेत मानवी तिरंगा ध्वज करत तसेच दिवसभर देशभक्ती गीतेही लावण्यात आली होती.
26 जुलै रोजी कारगिल युद्धाला 20 वर्षे पूर्ण झाली. त्या कारगिल विजय दिनानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांना या कारगिल परिसरात पाकिस्तानी लश्कर घूसखोरी केल्याची खबर कोणत्या गुराख्याने दिली, युद्धाची सुरुवात कोणत्या दिवशी झाली, हवाई दलाच्या मिग, जग्वार, मिराज अशा 200 लढाऊ विमानांचा तसेच बोफोर्स तोफाचा वापर, दारु गोळा, रॉकेट यांचा कसा वापर केला ते सांगितले. तसेच या युद्धात किती अधिकारी व आपले भारतीय जवान शहीद झाले याची ही सविस्तर माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परिपाठा वेळी दिली होती.
दुपारच्या सत्रात या कारगिल चित्रपटाचा प्रयोग विद्यार्थ्यांसाठी चालू केला होता, प्रत्यक्ष सिमेवरील युद्धजन्य परिस्थिती, जवान एकमेकांना देत असलेले आधार, शत्रुशी लढताना त्यांच्यात येत असलेली आक्रमकता, देशअभिमान, लढताना समोरून येणारी गोळी झेलणारा जवान, तसेच अंगावर गोळ्यांचा पाऊस जरी पडत असला तरी शत्रुला त्याच पद्धतीने उत्तर देणारे जवान हे सर्व पाहुन विद्यार्थी देश प्रेमाने भारावुन गेले होते. विद्यार्थ्यांना हा अनुभव खुप रोमांचकारी होता त्यांच्या अंगावर शहारे येत होते तर कांही विद्यार्थी विद्यार्थिनी कारगिल युद्धात लढत धारातीर्थी पडत शहीद झालेले जवान पाहुन डोळ्यातून अश्रु येत होते.
पापरी शाळेत परिपाठावेळी गेल्या दोन वर्षांपासून दररोज विद्यार्थी उन्ह, वारा, पाऊस, रात्रंदिवस सीमेवर उभे राहून आपल्या नागरिकांचे रक्षण करत असतात म्हणून जवानांचे व अनेक संकटांचा सामना करत आपल्या शेतात धान्य पिकवून अवघ्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे परिपाठा वेळी विद्यार्थी आभार मानात असतात. असा उपक्रम राबवणारी ही सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. या वेळी शिक्षक राजेन्द्र परदेशी, लक्ष्मण उगले, राजेन्द्र सरवदे, दत्तात्रय डोके, भास्कर थोरात मानाजी थोरात आदि उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.