आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षक विद्यार्थिनींना दाखवायचा अश्लील क्लिप, सिडको भागातील शाळेत घडला धक्कादायक प्रकार

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • सातवीच्या विद्यार्थिनीने घरी सांगितल्यानंतर उघडकीस आला प्रकार
  • तत्पूर्वी एका विद्यार्थिनीने पोलिसांना निनावी पत्राद्वारे दिली होती माहिती
  • संस्था आणि मुख्याध्यापक शिक्षकास पाठीशी घालत असल्याचा पालकांचा आरोप

औरंगाबाद - शहरातील एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनींना मोबाइलवर अश्लील क्लिप दाखवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधिक प्रकार समजताच संतप्त पालकांनी शाळेत गोंधळ घातला असून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संस्था आणि मुख्याध्यापक शिक्षकास पाठीशी घालत असल्याचा पालकांनी आरोप केला आहे. 
सिडको शहरातील एका शिक्षण संस्थेतील शिक्षक शाळेतील विद्यार्थिनींना मागील तीन दिवसांपासून विद्यालयाच्या वरच्या रूममध्ये बोलावून त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवत होता.  एका विद्यार्थिनीने पोलिसांना निनावी पत्र लिहून शाळेत घडत असलेला प्रकार सांगितला होता. दरम्यान एका सातवीतील विद्यार्थिनीने घरच्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पालकांनी मुख्याध्यापकास घेराव घालून संबंधिक प्रकाराचा जाब विचारला. संबंधिक शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांनी सिडको पोलिसांत गर्दी केली होती. दोषी शिक्षकाला पकडण्याची मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान संस्था आणि मुख्याध्यापक शिक्षकास पाठीशी घालत आहेत, मुलींनी घरी काही सांगू नये म्हणून दबाव आणल्याचा पालकांनी आरोप केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...