Home | National | Delhi | Teacher sticks tape on mouth of 2 primary students of 4 year old

गुडगांव : शिक्षिकेने मुलांना शांत करण्यासाठी लोअर केजीच्या मुलांच्या तोंडावर चिटकवली चिकटपट्टी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 05:07 PM IST

मुलांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून शाळा प्रशासनाने शिक्षिकेला निलंबित केले आहे.

  • Teacher sticks tape on mouth of 2 primary students of 4 year old

    गुडगांव - येथील एका खासगी शाळेतील महिला शिक्षिकेला मुलांच्या तोंडावर चिकटपट्टी चिटकवल्याच्या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. शिक्षिकेवर आरोप आहे की, त्यांनी लोअर केजीच्या वर्गातील दोन मुले शांत बसत नसल्याने त्यांना शांत बसवण्यासाठी त्यांच्या तोंडावर टेप लावला होता.


    ही घटना ऑक्टोबरमधील असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओदेखिल व्हायरल झाला आहे. त्यात महिला मुलांच्या तोंडावर टेप लावताना दिसत आहे. या मुलांचे वय अवघे चार वर्षांच्या आसपास आहे. यात एक मुलगा आणि एका मुलीचा समावेश आहे.

    वर्गाला त्रास देत होती मुले
    मुलांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून शाळा प्रशासनाने शिक्षिकेला निलंबित केले आहे. तर शिक्षिकेचे असे म्हणणे आहे की, मुले संपूर्ण वर्गालाच त्रास देत होते. तसेच चुकीच्या भाषेचा वापर करत होते.

Trending