आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघाने (एमफुक्टो) पुकारलेल्या कामबंद आंदोलन आज (२६ सप्टेंबर) दुसऱ्या दिवशी देखील सुरूच होते. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्राध्यापकांच्या मागण्यांना घेऊन थातूर-मातूर चर्चा करण्यात आल्याने कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय एमफुक्टोने घेतला असल्याची माहिती डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी दिली. 


तब्बल पाच हजार नियमित व कंत्राटी प्राध्यापक सहभागी झाल्याने पश्चिम विदर्भातील शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. प्राध्यापकांनी महाविद्यालयाबाहेर निदर्शने करीत सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाचा निषेध करीत कामबंद आंदोलन पुकारले आहे. प्राध्यापक भरती वरील बंदी उठवून भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीबाबत लवकरच शासन निर्णय निर्गमित होईल असे सांगण्यात आले. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षकीय एकाकी पदांवरील तसेच काही शिक्षकेतर तांत्रिक पदांवरील १०० टक्के आणि अधिव्याख्यात्यांच्या रिक्त पदांवरील बंद काही प्रमाणात उठविण्याची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, किती टक्के बंदी उठेल, कधी उठेल याबाबत माहिती देण्यात आली नाही. ७१ दिवसांच्या संप काळातील वेतनाबाबत वस्तुस्थितीदर्शक प्रस्ताव तयार करुन वित्त विभागाकडे सादर करण्याची कारवाई करण्याचे सुचित करण्यात आले. मात्र, यापूर्वी अनेकदा देण्यात आलेल्या प्रस्तावांचे झाले तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.२००५ पासून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे. त्यामुळे २००५ पासून पुढे नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. 

बातम्या आणखी आहेत...