डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
आपल्या देशाचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या वाढदिवशी हा दिन साजरा होतो. परंपरेनुसार, या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. विविध कार्यक्रम आयोजित करून शिक्षकमंडळींचा सन्मान केला जातो. "छडी लागे छम छम, विद्या येई घम घम' असे पूर्वी म्हटले जाई. किंबहुना, जुने गुरुजन ती पद्धत सर्रासपणे वापरीत. आज छडी गायब झाली आहे. त्याचबरोबर गुरू आणि शिष्य यांच्यातील नात्यात बदल होताना दिसत आहे . शिस्त ही तंबोऱ्याच्या तारांसारखी असते. तारा सैल ठेवल्या तर त्यातून बेसूर निघतात अन् जास्त आवळल्या तर तुटतात. शिक्षक हे जगातील सर्व समाजाचे दिशादर्शक असतात . आजच्या जगात मिळालेले ज्ञान हे स्वार्थासाठी नसून ते परमार्थासाठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदर केला पाहिजे.