आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Teacher's Day Special: Dr. Sarvapalli Radhakrishnan's School Was Famous For Banyan Tree

शिक्षक दिन विशेष: वडाच्या झाडामुळे प्रसिद्ध होती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची शाळा, आज प्रार्थनेआधी सांगितली जाते त्यांची गोष्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाॅ. राधाकृष्णन यांनी ज्या वर्गात शिक्षण घेतले त्या वर्गाचे छायाचित्र. - Divya Marathi
डाॅ. राधाकृष्णन यांनी ज्या वर्गात शिक्षण घेतले त्या वर्गाचे छायाचित्र.

तिरुतणी (चेन्नई)  - कार्तिकेयन, जयकुमार आणि जयचंद्रन तिरुतणी येथील शासकीय उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक आहेत. या तिघांनी याच शाळेत शिक्षण घेतले आहे. ही तीच शाळा आहे जेथे देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण घेतले होते. जयचंद्रन यांनी सांगितले की, शिक्षकासाठी झालेल्या मुलाखतीत त्यांना पहिला प्रश्न डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबाबतच विचारण्यात आला होता. या  शाळेत नियुक्ती मिळावी म्हणून त्यांनी अनेक वर्षे वाट पाहिली. ते सांगतात की, तिरुतणी येथे दहा खासगी आणि दोन शासकीय शाळा आहेत. मात्र, या शाळेत शिकणारे आणि शिकवणारे स्वत:ला नशीबवान समजतात. 

अंगणातील वडाच्या जुन्या झाडामुळे ही शाळा आलमरम हायर सेकंडरी स्कूल नावाने प्रसिद्ध होती. तामिळमध्ये वडाला आलमरम म्हटले जाते. आज अंगणात वडाचे नसले तरी त्याचा चौथरा आहे. चेन्नईपासून ५० किमी दूर असलेल्या तिरुतणी गावातील या शाळेत राधाकृष्णन पाचवीपर्यंत शिकले. गावातच त्यांचे एक घर आहे, जेथे वाचनालय आहे. त्यांच्या कुटुंबातील तसेच नातेवाईक कोणीही येथे राहत नाहीत. त्यांचे पणतू दरवर्षी त्यांचा वाढिदवस साजरा करण्यासाठी ५ सप्टेंबरला येथे येतात. त्यांच्या कुटुंबाच्या वतीने शाळेच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. येथे दररोज प्रार्थनेआधी मुलांना राधाकृष्णन यांच्या बाबतीत एखादी गोष्ट सांगितली जाते. सध्या ही जबाबदारी कार्तिकेयन यांच्यावर आहे. ते सांगतात की, ही परंपरा १५ वर्षांत एक दिवसही खंडित झाली नाही. त्या शिक्षकाची बदली होते तेव्हा काेणी तरी ही जबाबदारी स्वीकारतो. गांधीवादी विचारधारेचे समर्थक राधाकृष्णन यांच्या या शाळेत रोज मुलांना गांधीजींविषयी सांगितले जाते. या शाळेत शिकलेले पयनी शेखर आता जिल्हा शिक्षणाधिकारी आहेत. त्यांचे कार्यालय शाळेच्या आवारातच आहे. ते सांगतात की, राधाकृष्णन यांच्यासारखाच या शाळेतील मुलांमध्येही तंत्रज्ञानाबाबत रस आहे. मुलांच्या या आवडीत शाळेने मदत करावी, असा त्यांचा प्रयत्न असतो.