Home | TV Guide | Teacher's Day Special Tv Celebs Disclose Their Teacher Crush

या TV सेलिब्रिटींचे होते त्यांच्या Teacher वर Crush,दिव्यांकाला आवडायचे ट्रेकिंग इन्स्ट्रक्टर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 11:31 AM IST

आज 5 सप्टेंबर. हा दिवस आज सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

 • Teacher's Day Special Tv Celebs Disclose Their Teacher Crush

  मुंबई - आज 5 सप्टेंबर. हा दिवस आज सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असे टीचर असतात ज्यांच्याकडून आपण खूप काही शिकतो. पण बऱ्याचदा असे होते की, कुठला विशिष्ट शिक्षक आपला खास आवडीचा बनतो. असाच काहीसा अनुभव सेलिब्रेटींनीही आमच्या प्रतिनिधिसोबत शेअर केला आहे. जाणून घेऊया आज टीव्ही सेलिब्रेटींच्या टीचर क्रशविषयी...

  रश्मी देसाई
  मला गणित विषय अजिबात आवडायचा नाही. पण मी जेव्हा आठवीत होते तेव्हा मला माझ्या गणिताच्या टीचरवर क्रश झाला. त्यानंतर मी गणिताकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मी त्यांचे नाव नाही सांगू शकत पण ते माझे पहिले क्रश होते.

  दिव्यांका त्रिपाठी
  मला आजही आठवते जेव्हा मी शाळेत होती तेव्हा मला आणि माझ्या मैत्रिणीला आमच्या ट्रेकिंग इन्स्ट्रक्टरवर क्रश होता. ते फारच देखणे होते.हे जवळपास एक वर्ष चालले. आजही मी जेव्हा माझ्या त्या मैत्रिणीला भेटते तेव्हा त्या सरांचा विषय निघाल्यावर आम्ही फार हसतो.

  पुढील स्लाईडवर वाचा, टीव्ही सेलिब्रेटींच्या क्रशविषयी..

 • Teacher's Day Special Tv Celebs Disclose Their Teacher Crush

  अंकित गेरा 
  मी जेव्हा 11वीत होतो तेव्हा माझा माझ्या इंग्रजीच्या शिक्षिकेवर क्रश होता. त्यावेळी माझी हालत मैं हु नाच्या शाहरुख खानसारखी झाली होती. ती टीचर 5 फुट 8 इंच होती आणि रोज शाळेत साडी घालून येत असे. तिचे केस फार लांब होते आणि रोज नवा परफ्युम लावून ती येत असे. इतर तासाला मी सर्वात शेवटच्या बेंचवर बसायचो पण त्यांच्या तासाला मी सर्वात पुढे असायचो. असे जवळपास 1 वर्ष चालले आणि मी लव्ह लेटरही लिहीले होते. पण मी अजूनही त्या शिक्षिकेला विसरु शकत नाही.

 • Teacher's Day Special Tv Celebs Disclose Their Teacher Crush

  मोहम्मद नाजिम
  आठवीत असताना माझा माझ्या हिंदीच्या शिक्षिकेवर क्रश होता. मी रोज त्यांच्यासाठी फ्रेंडशिप बॅण्ड घेऊन जायचो आणि त्या मला रोज चॉकलेट द्यायच्या. त्या फारच सुंदर आणि आमच्या शाळेत प्रसिद्ध होत्या.

 • Teacher's Day Special Tv Celebs Disclose Their Teacher Crush

  मृणाल जैन
  जेव्हा मी नववीत होतोल तेव्हा माझा माझ्या इंग्रजी टीचरवर क्रश होता. मी रोज त्यांच्यासाठी लाल फुल घेऊन जायचो आणि त्यांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करायचो. टीचर फारच स्टायलिश आणि इंटलिजंट होत्या. त्यांनी एक दिवस मला क्लासचा मॉनिटर बनवले होते, त्यादिवशी मी फार खुश होतो. पण हे केवळ सहा महिने चालले. नंतर त्यांची ट्रान्सफर दुसऱ्या शाळेत झाली. 

 • Teacher's Day Special Tv Celebs Disclose Their Teacher Crush

  शरद मल्होत्रा
  शाळेमध्ये मला माझ्या हिस्ट्री टीचरवर क्रश होता. त्या फार छान शिकवायच्या त्यामुळेच माझे हिस्ट्रीमध्ये चांगले गुण यायचे. 

 • Teacher's Day Special Tv Celebs Disclose Their Teacher Crush

  करण ओबेरॉय
  जेव्हा मी 11वीत होतो तेव्हा माझा कॉम्प्युटर सायन्स टीचरवर क्रश होता. त्यांची पर्सनॅलिटी फारच छान होती. त्यांचा मी आवडता विद्यार्थी होतो. त्या वर्गात आल्यावर मी त्यांनाच पाहत बसायचो. 

 • Teacher's Day Special Tv Celebs Disclose Their Teacher Crush

  नेहा मर्दा
  मला माझ्या कॉम्प्युटर टीचरवर क्रश होता. ते फारच छान आणि टॅलेंटेड होते. ते आमच्या सर्वांसोबत खूप प्रेमाने बोलायचे. त्यांचा तास कधी येतो याची मी कायम वाट पाहायची. 

 • Teacher's Day Special Tv Celebs Disclose Their Teacher Crush

  जास्मिन भसीन
  मला माझ्या सोशल सायन्सच्या टीचरवर क्रश होता. ते फार गुड लुकिंग आणि हुशार होते. त्यांची बोलण्याची पद्धतही फार वेगळी होती. शाळेतल्या बऱ्याच मुलींना ते आवडायचे.

 • Teacher's Day Special Tv Celebs Disclose Their Teacher Crush

  शशांक व्यास
  मी जेव्हा सहावीत होतो तेव्हा माझा माझ्या कॉम्प्युटर टीचरवर क्रश होता. मला त्यांचे नाव आता आठवत नाही पण त्या फार सुंदर आणि हुशार होत्या. काही दिवसानंतर त्या शिक्षणासाठी अमेरिकेला निघून गेल्या. मला त्यांची प्रत्येक गोष्ट अजुनही आठवते. 

 • Teacher's Day Special Tv Celebs Disclose Their Teacher Crush

  कुणाल जयसिंह 
  मी जेव्हा दहावीत होतो तेव्हा माझा माझ्या इंग्रजीच्या मॅडम फार आवडायच्या. त्या फारच सुंदर होत्या. त्यांची प्रत्येक गोष्ट मला आवडत असे. जवळपास एक वर्ष असे चालले नंतर त्या कुठे गेल्या ते समजले नाही.

 • Teacher's Day Special Tv Celebs Disclose Their Teacher Crush

  गुंजन उतरेजा
  जेव्हा मी शाळेत होते तेव्हा माझ्या गणिताच्या शिक्षिका मला फार आवडायच्या. गणितासारखा कठीण विषयही त्या इतक्या छान शिकवायच्या की ते फार सोपे वाटायचे. त्यासोबतच त्या फार सुंदरही होत्या. 

 • Teacher's Day Special Tv Celebs Disclose Their Teacher Crush

  मनु पंजाबी
  माझ्या यूनिव्हर्सिटीच्या एका शिक्षिकेवर माझा क्रश होता. त्या फारच छान होत्या तसेच त्यांची पर्सनॅलिटीही फार छान होती.

Trending