आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय 30 सप्टेंबर या मानीव तारखास प्ले ग्रुप, नर्सरीसाठी तीन वर्षे पुर्ण, इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे असे संदर्भीय शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. यात शिथिलता देण्यात आली असून, त्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. पण शिक्षकांसाठी "सरल" पुन्हा एकदा कठीण ठरले आहे. कारण सरलची माहिती भरण्यासाठी अनेक शाळांमध्ये पुरेशी माहितीच गोळा झालेली नाही. त्यातच सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शिक्षक हैराण झाले आहे.
विद्यार्थी, शिक्षक, शाळा यांची माहिती एकाच पटलावर नोंदवण्यासाठी शिक्षण विभागाने "सरल'' ही प्रणाली सुरू केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबरोबरच इतर शिक्षक, शाळेतील सुविधा अशा विविध गोष्टींची नोंद करायची आहे. वेगवेगळ्या 30 हून अधिक मुद्दयांची माहिती शिक्षकांनी या प्रणालीत भरायची आहे. मात्र, तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अद्यापही अनेक शाळांमध्ये ही माहिती भरून झालेलीच नाही. विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यासाठी अडचणी येत असल्याचेही शिक्षक सांगत आहेत.
अनेक तपशील देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे ही माहिती भरताना शिक्षक हवालदिल झाले आहेत. इतर कामे आणि त्यातच अभ्यासक्रमही पूर्ण करणे आवश्यक आहे. शाळेतील शिक्षकांची संख्या मुळातच मर्यादित असल्याने सरलच्या कामासाठी एक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी गुंतवून ठेवावा लागत आहे. प्रत्येक वेळी ते शक्य होतेच असे नाही. संकेतस्थळ सुरू होण्यात अडचणी येतात. माहिती गोळा करण्यासाठी शाळांनी पालक सभेतही पालकांना माहिती दिली होती. मात्र, तरीही विद्यार्थ्यांची सर्व वैयक्तिक माहिती अद्याप आलेली नसल्याचे अनेक मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.
दरम्यान बालकांच्या शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चितीच्या आदेशामुळे सरल वर माहिती भरण्यासाठी शाळांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
बालकाचे वय निश्चितीचे आदेश
शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय 30 सप्टेंबर या मानीव तारखास प्ले ग्रुप, नर्सरीसाठी तीन वर्षे पुर्ण, इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे असे संदर्भीय शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणण्याबाबत शासनाकडे निवेदने प्राप्त होत आहेत. त्यास अनुसरुन शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता देण्याबाबतची बाबत शासनाने शाळा प्रवेशासाठी बालकांच्या वयामध्ये जास्तीतजास्त 15 दिवसांची शिथीलता देण्याचा आधिकार मुख्याध्यापकांना देण्याचे आदेश अवर सचीव संतोष गायकवाड यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.