आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षकच एकमेकांना भिडतात तेव्हा...; परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - जिंतूर तालुक्यातील भोसी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात पगारावरून चांगलाच वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांनी एकमेकांची कॉलर धरली. हा सर्व प्रकार शाळेतच घडला. 

 

गव्हाणे आणि रन्हेर या दोन शिक्षकांचा पगार झाला नव्हता. याबाबत संबंधित शिक्षकांनी शाळेचे मुख्याध्यापक आर.एम. सोंनेकर यांच्याकडे आमचा अद्याप पगार का झाला नाही याबाबत विचारणा केली. यातूनच शिक्षकांचा वाद सुरु झाला आणि दोघांनी एकमेकांची चक्क कॉलर पकडली. दरम्यान दुसऱ्या शिक्षकाने मात्र वाद मिटवायचे सोडून या भांडणाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकराबाबत वरिष्ठ काही कारवाई करतील का याकडे सर्वांचे लक्ष आहे.